मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे’ (मनसे )मालवण माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या माध्यमातून ‘दीपावली २०२३’ निमित्ताने किल्ला प्रतिकृती बनवणे व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक व ऐतिहासिक वारसा जपणार्या मालवण शहरात दिवाळी व पाडवा निमित्ताने विविध देखावे, मातीचे किल्ले बनवले जातात. हे औचित्य साधून मनसे मालवण शहराच्या वतीने तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या विचार मार्गदर्शनाखाली दिवाळी देखावा, किल्ला स्पर्धेचे आयोजन करायचा उद्देश माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी स्पष्ट केला आहे. मालवण मनसे माजी पदाधिकारी, मनविसे पदाधिकारी , महिला सदस्य व मनसैनिकांचे सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नेहमीच काटेकोरपणे प्रोत्साहन असते असेही विशाल ओटवणेकर यांनी सांगितले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी देखावा, किल्ला आदी फोटो ९३०९३२३१५५ या वाॅटस् ॲप नंबरवर पाठवावेत. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत अशी माहिती विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे.
(१० पेक्षा जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत प्रवेश घेतला तरच बक्षिस वितरणाचा विशेष समारंभ संपन्न होईल याचीही स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे.)