मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत गुणतक्त्यात अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विश्वचषकाची प्रतिकृती पेन्सिलच्या टोकावर बनवत भारतीय संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत.एखादे चित्र ड्रॉइंग पेपर वर काढत असताना पेन्सिलला बऱ्याच वेळा टोक काढावे लागतं. बऱ्याच वेळा हे टोक तुटते. अशा पेन्सिलच्या टोकावर अतिशय नाजूकपणे विश्व चषकाची प्रतिकृती साकारताना तब्बल दोन तासांचा अवधी लागला. त्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करण्यात आला. केवळ आठ मिलिमीटर उंची असलेल्या या विश्वचषकाच्या प्रतिकृतीत सोनेरी रंगाचा वापरही करण्यात आला.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -