दोनशे जणांमधून निवडले गेले रिबेकाचे डिझाईन…..
दुबई | स्पोर्ट्स ब्यूरो | क्रिडाविशेष : सध्या सुरु असणार्या टि ट्वेंन्टी विश्वचषकादरम्यान स्कॉटलंड संघाची जर्सी हा चर्चेचा विषय ठरत आहे.
कुठल्याही प्रायोजकत्वासाठी वगैरे नाही तर त्या जर्सीच्या डिझाईनसाठी ती चर्चेत आलीय.
बारा वर्षीय स्काॅटिश चिमुरडी कुमारी रिबेका डाऊनी या शाळकरी मुलीने ते डिझाईन तयार केले आहे.
स्कॉटलंड क्रिकेट बोर्डने क्रिकेट संघाच्या जर्सीसाठी एक स्पर्धा ठेवली होती. ज्याचे जर्सीचे डिझाईन निवडली जाणार होते त्याला,त्याच्या कुटुंबासह विश्वचषकाचे स्काॅटलंड संघाचे सामने मोफत पहायची संधी मिळणार होती. शिवाय सोबत विमान तिकिट, खाणेपिणे व रहाणे या सकट…!बारा वर्षाच्या रिबेकाचे डिझाईन 200 जणांमधून निवडले गेले.तिला व तिच्या पालकांना ही निवड समजतच
ते खूप गहिवरून गेले . राष्ट्रीय संघासाठी काहीतरी केले हे बोलताना त्यांचा आनंदही नीट व्यक्त होऊ शकत नव्हता.
स्कॉटलंड क्रिकेट मंडळाचेही अशा अभिनव संकल्पनेबद्दल जगभरातील अनेक क्रिडा मंडळांकडून स्वागत होत आहे ..