वैभववाडी | नवलराज काळे : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक येत्या ४ नोव्हेंबरला होत असून ९४ वर्षाची परंपरा असलेली ही पतसंस्था असुन आजपर्यंत या पतपेढीवर दिव्यांग शिक्षक बांधवांना कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करण्याची कोणत्याही पँनलने संधी दिली नव्हती. मात्र यावेळी महापरिवर्तन सहकार आघाडी या पँनेलने १३ संघटना एकत्र करुन महाआघाडी तयार केली त्यामध्ये त्यामध्ये जिल्ह्यात दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांच्या साठी उत्तम काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य (अपंग) दिव्यांग कर्मचारी संघटनेला सन्मानाने समाविष्ठ करुन घेतले व पँनेलच्या विजयानंतर पहिल्याच वर्षी दिव्यांग बांधवाचा सन्मान म्हणून स्वीकृत संचालक पदी निवड करणार असे जाहीर केले आहे.
महापरिवर्तन सहकार आघाडीने आपल्या जाहिरनाम्यात दिव्यांग शिक्षक बांधवांना कायम स्वरूपात दिव्यांग प्रवर्गातील संचालक पद मिळण्यासाठी शासनाकडे मागणी करणार, त्याचप्रमाणें ज्या सभासद शिक्षक यांची पाल्य दिव्यांग आहेत त्यांच्या शिक्षणासाठी विषेश शैक्षणिक कर्ज योजना राबविणार असे महत्त्वाचे दोन विषय दिव्यांगाची दखल घेणारे घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शिक्षक सभासद बांधवांनी एकमुखी पाठिंबा महापरिवर्तन सहकार आघाडीला जाहीर केल्याने सर्व दिव्यांग शिक्षक बांधवांनी महापरिवर्तन सहकार आघाडीच्या १६ उमेदवारांना छत्री या निशाणीवर शिक्का मारुन विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विलास गोरे (जिल्हाध्यक्ष)
आनंद त्रिपाठी (जिल्हा सरचिटणीस), राजेंद्र चव्हाण (सल्लागार), व्यंकटेश आटक, एजाज इब्जी (जिल्हा संघटक)
अनंत घवाले (उपाध्यक्ष)
अशोक जायभाये (कार्याध्यक्ष).
महिला संघटक : मानसी शिंदे सौरवी जाधव, रेणुका उपाध्याय शितल देवळेकर, दीक्षा कदम सारिका कदम.
तालुका अध्यक्ष सचिव प्रतिनिधी ;
(राजापूर )संतोष सावंत विजय मोहिते.
( लांजा )लिंगाण्णा भुसनूर, सविता पाटील.
(रत्नागिरी) सुरेश आंबेकर, गोविंद तारवे,
(संगमेश्वर)दिलिप टक्के मनोज मोहिते
(चिपळूण) रविंद्र घाणेकर संदिप राजे शिर्के.
(गुहागर) उदय रावणंग दशरथ कदम, अनगुड
(खेड)दिपक कांबळे संजय सांळुखे
(दापोली) सुग्रीव गुट्टे सोमनाथ माने अताउल्ला फकी
(मंडणगड)दाजी सापटे रवींद्र रेवाळे.