निवडक दिनविशेष : (बावीस ऑक्टोबर)
४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
१६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
१९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
२००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
२००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.