ग्रामपंचायत सदस्य भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांची वचनपूर्ती.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – देवगड – वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी तालुक्यातल्या शिराळे धनगरवाडा येथे शिराळे धनगर वस्तीच्या रस्त्याचे भूमिपूजन व शिराळे गावातील नवीन मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन संपन्न झाले. विशेष म्हणजे
पाण्याने भरलेल्या नदीतून कच्च्या रस्त्याने आमदार नितेश राणे धनगर वस्तीवर दाखल होताच ग्रामस्थांनी धनगरी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य व भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांना धनगरी फेटा बांधला व श्रीफळ, वृक्ष व घोंगडी देऊन त्यांचा स्वागत सत्कार केला.
या विकासकामांच्या पूर्ततेमुळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली. दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे व नवलराज काळे यांचे आभार मानले. ग्रामपंचायत सदस्य व भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आणि आगामी विकासकामांसाठी आमदार नितेश राणे व भाजप सदैव ग्रामस्थांच्या सोबत असतीलच अशी ग्वाही दिली.
यावेळी आमदार नितेश राणे साहेब यांच्या सोबत तालुकाध्यक्ष नासीर काझ़ी, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, प्राची तावडे, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य,नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका पाटील, शिराळे बूथ अध्यक्ष विजय पाटील, लक्ष्मण शेळके, सखाराम पाटील, गंगाराम शिंदे, सहदेव पाटील, अंबाजी बोडेकर, महेश डेळेकर, सुनील बोडेकर महेंद्र शेळके, प्रकाश शेळके, रामचंद्र शिंदे, गंगाराम बोडेकर, संतोष बोडेकर, बबन बोडेकर,जयवंत बोडेकर,संदीप धामणे,मंगेश शेळके, विठ्ठल शेळके, निलेश बोडेकर,गंगुबाई शेळके , कोंडाबाई शेळके, रुक्मिणी शेळके, अरुण बोडेकर, विवेक पाटील, कृष्णा पाटील, दिपक पाटील, हरिश्चंद्र पाटील व इतर सर्व ग्रामस्थ धनगर डोंगरी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.