25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मच्छीमारी व्यावसायिकांसाठी दिलासादायक खुषखबर ; मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : मच्छीमारी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र राज्यात प्रथमच इंधना संदर्भात पर्यायाची एक दिलासादायक खुषखबर समोर येत आहे. नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे कार्यकरिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मासेमारी नौकांमध्ये वापरले जाणारे इंधन, त्यांची किंमत आणि क्षमता ही खूप महत्त्वाची असते. सध्या स्थितीचा विचार करता मासेमारी नौकांमध्ये पेट्रोल व डिझेल हे दोन इंधनाचे पर्याय वापरले जातात. मागील काही काळात मत्स्य व्यवसायात घट झालेली आहे. त्याचबरोबर इंधनाचे अनिश्चित आणि वाढते दर हे सर्व प्रकारच्या मत्स्य व्यवसायिकांना मत्स्य व्यवसाय करण्यास त्रासदायक ठरत आहेत. उत्पन्नाचा मोठा वाटा इंधनावर खर्च होत असल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होत जात आहे. तसेच पेट्रोल व डिझेल या इंधनामुळे सागरी पर्यावरण प्रदूषण वाढत आहे.
मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा तसेच सागरी पर्यावरणाचा संतुलन रहावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने २०१६ पासून मत्स्यव्यवसाय मध्ये पर्यायी इंधना बाबत संशोधन सुरू केले होते .पर्यायी इंधनांमध्ये एलपीजी, सीएनजी, इथेनोल,मिथेनॉल अशा विविध पर्यायांचा समावेश आहे .यापैकी एलपीजी म्हणजेच गॅस वर चालणाऱ्या नौका इंजिनाची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मालवण व देवगड या ठिकाणी घेतली गेली. दोन्ही ठिकाणी झालेल्या चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या . लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनाचे रूपांतर एलपीजी तसेच सीएन एलजी मध्ये करण्यासाठी चे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छीमाराला कमीत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे .

या चाचण्या या महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याकडून आयोजित करण्यात आल्या होत्या .सदरच्या गॅसवर चालणाऱ्या इंजिनाबाबत माहिती देण्यासाठी काल दिनांक २१ ऑक्टोबर व २२ ऑक्टोबर रोजी मालवण येथील रामेश्वर सोसायटी तसेच देवगड येथील विठ्ठल रखुमाई मंदिर आनंदवाडी या ठिकाणी कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिक दाखवण्यात आली .यामध्ये आऊट बोट धारक नौकांना सदरचे गॅसवरील इंजिन लावून समुद्रामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या अत्यंत यशस्वी झाल्या असून स्थानिक मच्छीमारांनी सुद्धा पर्यायी इंधन म्हणून गॅस वापराबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या तंत्रज्ञानासाठी शासकीय योजनातून मच्छीमारांना अनुदान मिळवून देऊ देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. अलगिरी यांनी सांगितले . तसेच प्रायोगिक तत्त्वावर गॅस वर चालणारी पाच इंजिने प्रति तालुका मासेमारी व पर्यटन व्यवसायिकांना देण्याची मागणी उपस्थित मच्छिमार यांनी केली. यावर कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा प्रकारच्या पर्यायी इंधनाचा वापर केरळ येथील कोलम बीचवर होत आहे. मासेमारी नौका मध्ये पर्यायी इंधनाचा वापर आणि त्याच्या चाचण्या महाराष्ट्र किनारपट्टीवर मालवण येथे प्रथमच करण्यात आल्या. पुणे येथील अनुभवी आणि सन १९४८ साल पासून कार्यरत असलेल्या ‘वनाज’ह्या कंपनीमार्फत या चाचण्या यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. या चाचण्यांसाठी मालवण येथील रामेश्वर सोसायटीचे अध्यक्ष श्री जगदीश खराडे, श्री लिओ काळसेकर तसेच देवगड येथील श्री. अप्पा खवळे तसेच इतर मच्छीमारांनी सहकार्य केले. यावेळी मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झाल्टे, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, मत्स्य व्यवसाय अधिकारी कुमारी तेजस्विता करंगुटकर, तसेच वनाज कंपनीचे सेल्स व मार्केटिंग मॅनेजर श्री अरविंद पाटील श्री गुरव, श्री भुजबळ , हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे श्री निखिल यांनी तसेच देवगड येथील परवाना अधिकारी श्री मालवणकर यांनी उपस्थित मच्छीमार यांना मार्गदर्शन केले आणि सदरच्या पर्यायी इंधन इंजिनाबाबत माहिती दिली.

मालवण येथे श्री विकी चोपडेकर, माजी नगरसेवक पंकज सादये, महेंद्र पराडकर, प्रमोद वाडेकर, भाऊ मोर्जे, मिथुन, बबलु मोंडकर, नामदेव केळुस्कर, तुषार आचरेकर, मंगेश धुरी, किशोर बांदकर, संतोष ढोके, सौ.सतेजा वायंगणकर तसेच रामेश्वर सोसायटी सभासद उपस्थित होते. देवगड येथे श्री संजय बांदकर, श्री. दिनेश मोसम, श्री. प्रदीप कोयंडे, गुरुनाथ तारी, पिंकू कुबल, दत्ता कोयडे, श्री. रत्नाकर प्रभू व इतर मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्ष, प्रतिनिधी, मच्छीमार, सागर मित्र, सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

नीलक्रांती संस्थेतर्फे मेरीटाईम बोर्ड यांना सोबत घेऊन लवकरच अशीच चाचणी ही पर्यटन व्यवसायात वापरात येणाऱ्या नौकांसाठी घेण्यात येणार आहे. मासेमारी तसेच पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेल्या नौका साठी पर्यायी इंधनाबाबत निलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था गेले सहा महिने विविध प्रयोग व अभ्यास पुणे येथील डेकाग्रीन या कंपनीबरोबर करीत होती . या पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे मासेमारी व पर्यटन क्षेत्राला इंधन दरवाढीतून दिलासा मिळणार असून सागरी पर्यावरण प्रदूषणात पण घट होणार आहे. एलपीजी व सीएनजी वापरासाठी केंद्र सरकारच्या प्राथमिक परवानग्या मिळालेल्या असुन लवकरात पर्यायी इंधन म्हणुन मासेमारी व्यवसायात दैनंदिन वापरात येण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे असे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : मच्छीमारी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र राज्यात प्रथमच इंधना संदर्भात पर्यायाची एक दिलासादायक खुषखबर समोर येत आहे. नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे कार्यकरिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मासेमारी नौकांमध्ये वापरले जाणारे इंधन, त्यांची किंमत आणि क्षमता ही खूप महत्त्वाची असते. सध्या स्थितीचा विचार करता मासेमारी नौकांमध्ये पेट्रोल व डिझेल हे दोन इंधनाचे पर्याय वापरले जातात. मागील काही काळात मत्स्य व्यवसायात घट झालेली आहे. त्याचबरोबर इंधनाचे अनिश्चित आणि वाढते दर हे सर्व प्रकारच्या मत्स्य व्यवसायिकांना मत्स्य व्यवसाय करण्यास त्रासदायक ठरत आहेत. उत्पन्नाचा मोठा वाटा इंधनावर खर्च होत असल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होत जात आहे. तसेच पेट्रोल व डिझेल या इंधनामुळे सागरी पर्यावरण प्रदूषण वाढत आहे.
मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा तसेच सागरी पर्यावरणाचा संतुलन रहावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने २०१६ पासून मत्स्यव्यवसाय मध्ये पर्यायी इंधना बाबत संशोधन सुरू केले होते .पर्यायी इंधनांमध्ये एलपीजी, सीएनजी, इथेनोल,मिथेनॉल अशा विविध पर्यायांचा समावेश आहे .यापैकी एलपीजी म्हणजेच गॅस वर चालणाऱ्या नौका इंजिनाची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मालवण व देवगड या ठिकाणी घेतली गेली. दोन्ही ठिकाणी झालेल्या चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या . लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनाचे रूपांतर एलपीजी तसेच सीएन एलजी मध्ये करण्यासाठी चे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छीमाराला कमीत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे .

या चाचण्या या महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याकडून आयोजित करण्यात आल्या होत्या .सदरच्या गॅसवर चालणाऱ्या इंजिनाबाबत माहिती देण्यासाठी काल दिनांक २१ ऑक्टोबर व २२ ऑक्टोबर रोजी मालवण येथील रामेश्वर सोसायटी तसेच देवगड येथील विठ्ठल रखुमाई मंदिर आनंदवाडी या ठिकाणी कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिक दाखवण्यात आली .यामध्ये आऊट बोट धारक नौकांना सदरचे गॅसवरील इंजिन लावून समुद्रामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या अत्यंत यशस्वी झाल्या असून स्थानिक मच्छीमारांनी सुद्धा पर्यायी इंधन म्हणून गॅस वापराबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या तंत्रज्ञानासाठी शासकीय योजनातून मच्छीमारांना अनुदान मिळवून देऊ देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. अलगिरी यांनी सांगितले . तसेच प्रायोगिक तत्त्वावर गॅस वर चालणारी पाच इंजिने प्रति तालुका मासेमारी व पर्यटन व्यवसायिकांना देण्याची मागणी उपस्थित मच्छिमार यांनी केली. यावर कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा प्रकारच्या पर्यायी इंधनाचा वापर केरळ येथील कोलम बीचवर होत आहे. मासेमारी नौका मध्ये पर्यायी इंधनाचा वापर आणि त्याच्या चाचण्या महाराष्ट्र किनारपट्टीवर मालवण येथे प्रथमच करण्यात आल्या. पुणे येथील अनुभवी आणि सन १९४८ साल पासून कार्यरत असलेल्या 'वनाज'ह्या कंपनीमार्फत या चाचण्या यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. या चाचण्यांसाठी मालवण येथील रामेश्वर सोसायटीचे अध्यक्ष श्री जगदीश खराडे, श्री लिओ काळसेकर तसेच देवगड येथील श्री. अप्पा खवळे तसेच इतर मच्छीमारांनी सहकार्य केले. यावेळी मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झाल्टे, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, मत्स्य व्यवसाय अधिकारी कुमारी तेजस्विता करंगुटकर, तसेच वनाज कंपनीचे सेल्स व मार्केटिंग मॅनेजर श्री अरविंद पाटील श्री गुरव, श्री भुजबळ , हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे श्री निखिल यांनी तसेच देवगड येथील परवाना अधिकारी श्री मालवणकर यांनी उपस्थित मच्छीमार यांना मार्गदर्शन केले आणि सदरच्या पर्यायी इंधन इंजिनाबाबत माहिती दिली.

मालवण येथे श्री विकी चोपडेकर, माजी नगरसेवक पंकज सादये, महेंद्र पराडकर, प्रमोद वाडेकर, भाऊ मोर्जे, मिथुन, बबलु मोंडकर, नामदेव केळुस्कर, तुषार आचरेकर, मंगेश धुरी, किशोर बांदकर, संतोष ढोके, सौ.सतेजा वायंगणकर तसेच रामेश्वर सोसायटी सभासद उपस्थित होते. देवगड येथे श्री संजय बांदकर, श्री. दिनेश मोसम, श्री. प्रदीप कोयंडे, गुरुनाथ तारी, पिंकू कुबल, दत्ता कोयडे, श्री. रत्नाकर प्रभू व इतर मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्ष, प्रतिनिधी, मच्छीमार, सागर मित्र, सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

नीलक्रांती संस्थेतर्फे मेरीटाईम बोर्ड यांना सोबत घेऊन लवकरच अशीच चाचणी ही पर्यटन व्यवसायात वापरात येणाऱ्या नौकांसाठी घेण्यात येणार आहे. मासेमारी तसेच पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेल्या नौका साठी पर्यायी इंधनाबाबत निलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था गेले सहा महिने विविध प्रयोग व अभ्यास पुणे येथील डेकाग्रीन या कंपनीबरोबर करीत होती . या पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे मासेमारी व पर्यटन क्षेत्राला इंधन दरवाढीतून दिलासा मिळणार असून सागरी पर्यावरण प्रदूषणात पण घट होणार आहे. एलपीजी व सीएनजी वापरासाठी केंद्र सरकारच्या प्राथमिक परवानग्या मिळालेल्या असुन लवकरात पर्यायी इंधन म्हणुन मासेमारी व्यवसायात दैनंदिन वापरात येण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे असे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!