पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांसाठी आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया ;भाजप जिल्हा उपाध्यक्ष व वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. प्रमोद रावराणे व माजी जि प सदस्य सुधीर नकाशे यांनी जास्तीत जास्त जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचे केले आवाहन.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या एडगांव ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २८ ऑक्टोबरला हे शिबीर ज्योत महिला ग्रामसंघ एडगांव – वायंबोशी आणि बीकेएल वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात हार्निया, मुतखडि, मूळव्याध, प्रोस्टेट ग्रंथी, अल्सर, टाॅन्सिल्स, मोतीबिंदू व शस्त्रक्रिया, चरबीच्या गाठी, पित्ताशयातील खडे, अपॅन्डिक्स, कानाच्या पडद्याची तपासणी, महिलांच्या गर्भाशयाची तपासणी व शस्त्रक्रिया, हायड्रोसेल, थायराॅईड, स्तनाचा कॅन्सर, फायब्रोडेनोमा, तोंडाचा कॅन्सर, इंप्लांट रिमूवर अशा आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातील.
या शिबिरात जनरल सर्जन, जनरल मेडिसीन, अस्थिरोग तज्ञ, नाक – कान – घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ञांचे निदान व उपचार सहकार्य होणार आहे. तपासणी दरम्यान रुग्ण शस्त्रक्रिया करण्या योग्य असला तर पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांसाठी आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तपासणीसाठी येताना मूळ रेशनकार्ड, ओळखपत्र, जुने तपासणी रिपोर्ट आणणे आवश्यक आहे.
या शिबिराचा परिसरातील जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजप जिल्हा उपाध्यक्ष व वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. प्रमोद रावराणे यांनी केले आहे. या आरोग्य शिबिराविषयी अधिक माहितीसाठी माजी जिल्हा परीषद सदस्य श्री. सुधीर नकाशे यांच्याशी ७७४३९८६०८८ या क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.