23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रवी पुजारी गॅन्गच्या शार्प शूटरला विमानतळावर अटक ; इमिग्रेशन अधिकार्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घेरत केले पोलिसांच्या स्वाधीन.

- Advertisement -
- Advertisement -

६ वर्षे अरब देशांत होता लपून..!

ब्यूरो न्यूज | मुंबई : कुख्यात खंडणीखोर गॅन्गस्टर रवी पुजारीच्या टोळीत कार्यरत असलेल्या विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

अरब आखाती देशातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला एलओसीच्या आधारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांकडं सुपूर्द केलं. त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात आरोपी विजय हा फरार आरोपी विजय उर्फ तांबट याने बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी काही शार्प शूटर पाठविले होते. मात्र पोलिसांनी त्यांना रिवाॅल्वर आणि काडतुसांसह अटक केली होती. तेव्हा पासून कासारवडवली पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा हे आरोपी विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देऊन पलायन करण्यात तो यशस्वी ठरला होता.

दरम्यान ठाणे गुन्हे शाखेने एलओसी जारी केल्यानं त्याची दखल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घेरत विजय याला विमानतळावरच जेरबंद केले. त्यानंतर त्याला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

६ वर्षे अरब देशांत होता लपून..!

ब्यूरो न्यूज | मुंबई : कुख्यात खंडणीखोर गॅन्गस्टर रवी पुजारीच्या टोळीत कार्यरत असलेल्या विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

अरब आखाती देशातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला एलओसीच्या आधारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांकडं सुपूर्द केलं. त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात आरोपी विजय हा फरार आरोपी विजय उर्फ तांबट याने बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी काही शार्प शूटर पाठविले होते. मात्र पोलिसांनी त्यांना रिवाॅल्वर आणि काडतुसांसह अटक केली होती. तेव्हा पासून कासारवडवली पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा हे आरोपी विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देऊन पलायन करण्यात तो यशस्वी ठरला होता.

दरम्यान ठाणे गुन्हे शाखेने एलओसी जारी केल्यानं त्याची दखल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घेरत विजय याला विमानतळावरच जेरबंद केले. त्यानंतर त्याला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!