24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आज तिच्या दारी, ‘बालपणाला’ सोबत घेत ‘बाईपणाचा’ जागर होणार भारी..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या खास महिलांसाठी एक मुक्त आंदन अंगण म्हणजे सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांचा सर्व स्तरातील स्त्रीयांसाठी आयोजीत महिलांचा गरबा. या गरब्याचे जे अंगण आहे ते ‘तिचेच’ म्हणजे सौ. शिल्पा यतीन खोत यांचे असते. त्यांचे एखादा उपक्रम निव्वळ महिलांसाठी असा आखायचे हे १० वे वर्ष असून यातीलच एखादा दिवस त्या लहान मुला मुलींसाठीही राखून ठेवतात म्हणूनच तर बाईपणाचा समृद्ध अनुभवी जागर हा निरागस बालपणाचाही हात धरत त्यांच्या गरब्याला एक वेगळाच फेर धरतो.

राजकीय क्षेत्राचा उंबरठा असलेल्या सामाजीक चळवळीत युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने धुरीवाडा येथे महिला गरब्यात आज शनिवारी २१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता महिला आणि मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उद्या २२ ऑक्टोबरला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवसां दरम्यान आज आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली आहे.

लहान मुलांसाठी ३ ते ५ वर्षे, ६ ते १० वर्षे आणि ११ वर्षांपासून पुढे खुला गट असे तीन गट ठेवण्यात आले असून महिलांच्या वेषभूषा स्पर्धा खुल्या गटात होतील. नांवनोंदणी आणि अधिक माहितीसाठी सौ शिल्पा खोत ९४२२५८४६४२, ८३९०१०३३३०, तन्वी भगत, दिया पवार ८०१०२५७९३२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बाईपणाच्या समृद्ध जागरात निरागस बालपण बागडते त्याची प्रसन्न आणि नियोजनबद्ध प्रचिती सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या खास महिलांसाठी एक मुक्त आंदन अंगण म्हणजे सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांचा सर्व स्तरातील स्त्रीयांसाठी आयोजीत महिलांचा गरबा. या गरब्याचे जे अंगण आहे ते 'तिचेच' म्हणजे सौ. शिल्पा यतीन खोत यांचे असते. त्यांचे एखादा उपक्रम निव्वळ महिलांसाठी असा आखायचे हे १० वे वर्ष असून यातीलच एखादा दिवस त्या लहान मुला मुलींसाठीही राखून ठेवतात म्हणूनच तर बाईपणाचा समृद्ध अनुभवी जागर हा निरागस बालपणाचाही हात धरत त्यांच्या गरब्याला एक वेगळाच फेर धरतो.

राजकीय क्षेत्राचा उंबरठा असलेल्या सामाजीक चळवळीत युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने धुरीवाडा येथे महिला गरब्यात आज शनिवारी २१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता महिला आणि मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उद्या २२ ऑक्टोबरला महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' हा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवसां दरम्यान आज आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली आहे.

लहान मुलांसाठी ३ ते ५ वर्षे, ६ ते १० वर्षे आणि ११ वर्षांपासून पुढे खुला गट असे तीन गट ठेवण्यात आले असून महिलांच्या वेषभूषा स्पर्धा खुल्या गटात होतील. नांवनोंदणी आणि अधिक माहितीसाठी सौ शिल्पा खोत ९४२२५८४६४२, ८३९०१०३३३०, तन्वी भगत, दिया पवार ८०१०२५७९३२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बाईपणाच्या समृद्ध जागरात निरागस बालपण बागडते त्याची प्रसन्न आणि नियोजनबद्ध प्रचिती सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

error: Content is protected !!