तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथे भाजपने निवडणुकांपूर्वी मुसंडी मारत ताकद वाढवली आहे. भाजपचे युवानेते माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देवबाग गांवात शिवसेना ठाकरे गटाला एक प्रकारे शह द्यायचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटाच्या माजी पंचायत समिती सदस्य सौ मधुरा चोपडेकर यांनी काल बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते देवबाग गांवात दत्ता सामंत यांच्या माध्यमातून विकास होतो आहे त्यांनी येथील ग्रामस्थांना दिलेल्या विकासाचा प्रत्येक शब्द आम्ही पक्ष म्हणून कमी पडू देणार नाही येथील विकास कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल अशी ग्वाही माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी यावेळी दिली. यावेळी सौ चोपडेकर यांच्यासह मकरंद झोपडेकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अलिप्त असलेले सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार नादार तुळसकर हे सुद्धा पक्षात आता कार्यरत झाले आहेत.
हा पक्ष प्रवेश मत्स्यगंधा थियटर मध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी सभापती सुनील घाडिगांवकर, चौके माजी सरपंच राजा गावडे, माजी पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, देवबाग उपसरपंच घनःश्याम बिले, स्वरा तांडेल, नादार तुळसकर, जयवंत सावंत, मकरंद चोपडेकर यांच्यासह युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाजयुमोचे मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण शहराध्यक्ष ललित चव्हाण, सहदेव साळगांवकर, दत्ता चोपडेकर, दिनू कासवकर, बाबू कासवकर पंकज मालवणकर, राजू बिडये असे अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.