तालुका प्रमुख हरी खोबरेकर व मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यासह आचरा विभागातील असंख्य शिवसैनिक, युवासैनिक, युवती सेनेच्या कार्यकर्त्या तसेच महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य होते उपस्थित.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा गांवातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच आचरा विभाग शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेशाने चैतन्य आणलेले सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांनी आचरा ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या सह जाऊन दर्शन घेतले. १६ ऑक्टोबरला ग्रामपंचायत निवडणूकीचा फाॅर्म भरण्याच्या पार्श्वभूमीवर श्री देव रामेश्वर चरणी सर्व आचरा वासिय तसेच विभागातील नागरीकांच्या विकासाच्या प्रार्थनेसाठी सर्वांनी दर्शन घेतले असे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांनी सांगितले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक श्याम घाडी, विनायक ( भाऊ ) परब, सौ. अनुष्का गांवकर, श्रीम. श्रद्धा सक्रू, विनायक परब, श्याम घाडी, रुपम टेमकर, संजय तारी, श्री मेस्त्री, सचिन बागवे, चंदन पांगे, नितीन घाडी, अंबू घाडी, डुबा परब, श्री मांजरेकर तसेच आचरा विभाग व मालवण तालुक्यातील असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, युवती सेनेच्या कार्यकर्त्या, युवासैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक व महिला आघाडी सदस्यांची मोठी उपस्थिती होती.