मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे १५ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत मालवणच्या स.का.पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रेश्मा पांढरे हिने चमकदार कामगिरी केली. क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजीत क्रीडा संकुल ओरोस येथे ही स्पर्धा संपन्न झाली. कु.रेश्मा रावबा पांढरे या खेळाडू विद्यार्थिनीने ८०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात जिल्ह्यात पहिला येण्याचा मान पटकावला असून त्यांची सांगली येथे होणाऱ्या विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा.डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. एम. आर. खोत व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.