31.3 C
Mālvan
Sunday, April 27, 2025
IMG-20250426-WA0000
IMG-20240531-WA0007

राॅक गार्डनची सध्याची दुर्दशा ही नगरपरीषद प्रशासनाची अक्षम्य चूक ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची खरमरीत टीका..!

- Advertisement -
- Advertisement -

मुख्याधिकारी व प्रशासकांनी एखादा इव्हेंट राॅक गार्डनमध्येही आयोजीत करुन पर्यटकांची व जनतेची ‘नाराजी’ कशी असते ते अनुभवण्याचाही दिला सल्ला..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवणच्या राॅक गार्डनमध्ये सध्या दुरावस्था असून त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला जबाबदार धरले आहे. या गलथानपणाची वाईट परिणीती मालवणच्या पर्यटनावर व रोजगारावर होणार असून ही चूक अक्षम्य असल्याचे सांगत त्यांनी याबाबत एका प्रसिद्धी पत्र संदेशाद्वारे खंत व चिंता व्यक्त केली आहे.

मालवणचे रॉकगार्डन हे दिवसेदिवस पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. यामुळे मिळणाऱ्या नाममात्र प्रवेश फी पासून परिषदेच्या उत्पन्नातही भर पडत आहे. असे असताना प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे सध्या रॉक गार्डन मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गार्डन मध्ये बऱ्याच ठिकाणी काळोखाचे साम्राज्य झाले आहे. ज्या ठिकाणी मुलांना खेळण्या साठी खेळणी बसवली आहे त्या ठिकाणचे दिवे बंद आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात व दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्र संदेशात सांगितले आहे. प्रसाधनगृहांमध्ये लाईट नाही. रॉक गार्डन च्या सौदंर्यात भर पडावी म्हणून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या व सहकारी नगरसेवकांच्या कालावधीत सुमारे ९५ लाखाचा म्युझिकल फाऊन्टन बसविण्यात आला. फाऊन्टन बसविल्या नंतर पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली. पर्यायाने रॉक गार्डन परिसरातील व्यावसाईकांच्या व्यवसायात वाढ झाली. नवीन व्यावसाईकही वाढले. परंतु सध्या पर्यटन हंगाम सुरु होवूनही हा म्युझिकल फाऊन्टन बंद आहे. येणाऱ्या पर्यटकांचा त्यामुळे हिरमोड होत आहे. गार्डन मधल्या या अनेक गैरसोयींबाबत पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.

रॉक गार्डन मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडून नाममात्र ५/_ रुपये प्रवेश शुल्क आकारले जात होते. यापासून नगर परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पण सध्या प्रवेश शुल्कही आकारले जात नाही. ऑक्टोबर मध्ये सलग सुट्यां मध्ये हजारो पर्यटक मालवण मध्ये येऊन गेले आहेत. प्रवेश शुल्क काऊन्टर बंद असल्याने रॉक गार्डन ला भेट दिलेल्या पर्यटकांकडून मिळणारे प्रवेश शुल्काचे नगरपरिषदेचे हक्काचे उत्पन्न बुडले आहे याची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न महेश कांदळगांवकर यांनी उपस्थित केला आहे.

रॉक गार्डन मध्ये शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करुन ‘आय लव्ह मालवण’ हा सेल्फी पॉईंट वर्षा पूर्वी बसविण्यात आला आहे. रात्रीच्या लाईट मध्ये हा अजून आकर्षक दिसत आहे. त्यामुळे रॉक गार्डन च्या सौदर्यातहि भर पडली आहे. येणाच्या बहुतांशी पर्यटकांना या सेल्फी पॉईंट सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. पर्यायाने आपल्या मालवण चे नाव राज्यात सगळीकडे जाण्यास मदत होत आहे. पण सध्या हा सेल्फी पॉईंट काळोखात आहे. त्याच्या सर्व फ्लड लाईट बंद आहेत असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

या रॉक गार्डन च्या जडणघडणीत प्रत्येक लोकप्रतिनिधिनी आपापल्या काळात प्रयत्न करून अल्पावधित गार्डन पर्यटन दृष्टया सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मालवण मध्ये येणारा बहुतांशी पर्यटक हा रॉक गार्डन ला भेट देत आहे असे असताना फक्त प्रशासनाच्या अक्ष्यम्य दुर्लक्षामुळे सध्या राॅक गार्डनमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यटकांची नाराजी समोर येत आहे. त्यामुळे याचा परिणाम रॉक गार्डन च्या लोकप्रियतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांनी रॉक गार्डन याठिकाणी सुद्धा एखादा इव्हेंट करावा जेणे करून रॉक गार्डनची सध्याची झालेली दुर्दशा पाहता येईल आणि पर्यटकांची व जनतेची नाराजी काय असते हे पण अनुभवता येईल असा सल्ला महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुख्याधिकारी व प्रशासकांनी एखादा इव्हेंट राॅक गार्डनमध्येही आयोजीत करुन पर्यटकांची व जनतेची 'नाराजी' कशी असते ते अनुभवण्याचाही दिला सल्ला..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवणच्या राॅक गार्डनमध्ये सध्या दुरावस्था असून त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला जबाबदार धरले आहे. या गलथानपणाची वाईट परिणीती मालवणच्या पर्यटनावर व रोजगारावर होणार असून ही चूक अक्षम्य असल्याचे सांगत त्यांनी याबाबत एका प्रसिद्धी पत्र संदेशाद्वारे खंत व चिंता व्यक्त केली आहे.

मालवणचे रॉकगार्डन हे दिवसेदिवस पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. यामुळे मिळणाऱ्या नाममात्र प्रवेश फी पासून परिषदेच्या उत्पन्नातही भर पडत आहे. असे असताना प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे सध्या रॉक गार्डन मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गार्डन मध्ये बऱ्याच ठिकाणी काळोखाचे साम्राज्य झाले आहे. ज्या ठिकाणी मुलांना खेळण्या साठी खेळणी बसवली आहे त्या ठिकाणचे दिवे बंद आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात व दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्र संदेशात सांगितले आहे. प्रसाधनगृहांमध्ये लाईट नाही. रॉक गार्डन च्या सौदंर्यात भर पडावी म्हणून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या व सहकारी नगरसेवकांच्या कालावधीत सुमारे ९५ लाखाचा म्युझिकल फाऊन्टन बसविण्यात आला. फाऊन्टन बसविल्या नंतर पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली. पर्यायाने रॉक गार्डन परिसरातील व्यावसाईकांच्या व्यवसायात वाढ झाली. नवीन व्यावसाईकही वाढले. परंतु सध्या पर्यटन हंगाम सुरु होवूनही हा म्युझिकल फाऊन्टन बंद आहे. येणाऱ्या पर्यटकांचा त्यामुळे हिरमोड होत आहे. गार्डन मधल्या या अनेक गैरसोयींबाबत पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.

रॉक गार्डन मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडून नाममात्र ५/_ रुपये प्रवेश शुल्क आकारले जात होते. यापासून नगर परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पण सध्या प्रवेश शुल्कही आकारले जात नाही. ऑक्टोबर मध्ये सलग सुट्यां मध्ये हजारो पर्यटक मालवण मध्ये येऊन गेले आहेत. प्रवेश शुल्क काऊन्टर बंद असल्याने रॉक गार्डन ला भेट दिलेल्या पर्यटकांकडून मिळणारे प्रवेश शुल्काचे नगरपरिषदेचे हक्काचे उत्पन्न बुडले आहे याची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न महेश कांदळगांवकर यांनी उपस्थित केला आहे.

रॉक गार्डन मध्ये शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करुन 'आय लव्ह मालवण' हा सेल्फी पॉईंट वर्षा पूर्वी बसविण्यात आला आहे. रात्रीच्या लाईट मध्ये हा अजून आकर्षक दिसत आहे. त्यामुळे रॉक गार्डन च्या सौदर्यातहि भर पडली आहे. येणाच्या बहुतांशी पर्यटकांना या सेल्फी पॉईंट सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. पर्यायाने आपल्या मालवण चे नाव राज्यात सगळीकडे जाण्यास मदत होत आहे. पण सध्या हा सेल्फी पॉईंट काळोखात आहे. त्याच्या सर्व फ्लड लाईट बंद आहेत असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

या रॉक गार्डन च्या जडणघडणीत प्रत्येक लोकप्रतिनिधिनी आपापल्या काळात प्रयत्न करून अल्पावधित गार्डन पर्यटन दृष्टया सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मालवण मध्ये येणारा बहुतांशी पर्यटक हा रॉक गार्डन ला भेट देत आहे असे असताना फक्त प्रशासनाच्या अक्ष्यम्य दुर्लक्षामुळे सध्या राॅक गार्डनमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यटकांची नाराजी समोर येत आहे. त्यामुळे याचा परिणाम रॉक गार्डन च्या लोकप्रियतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांनी रॉक गार्डन याठिकाणी सुद्धा एखादा इव्हेंट करावा जेणे करून रॉक गार्डनची सध्याची झालेली दुर्दशा पाहता येईल आणि पर्यटकांची व जनतेची नाराजी काय असते हे पण अनुभवता येईल असा सल्ला महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!