विनीत मंडलीक | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिरवंडे येथे संपन्न झालेल्या क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित मालवण तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये स.का.पाटील सिंधुदुर्ग काॅलेज संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
मुलांमध्ये आदेश हाक्के याने ४०० मी. धावणे द्वितीय क्रमांक ,३ किमी. धावणे द्वितीय क्रमांक,गोळाफेक द्वितीय क्रमांक मिळवला. मिथिलेश खराडे भालाफेक द्वितीय क्रमांक, साईप्रसाद अटक : २०० मी. धावणे तृतीय क्रमांक तसेच उंच उडी तृतीय क्रमांक मुलींमध्ये रेश्मा पांढरे यांनी ८०० मी. धावणे प्रथम क्रमांक,थाळीफेक : द्वितीय क्रमांक,लांबउडी : द्वितीय क्रमांक मिळवला.क्षितिजा खरवते ४०० मी धावणे द्वितीय क्रमांक , आर्या किडये १०० मी. धावणे प्रथम क्रमांक , निर्जरा कांबळी १०० मी हर्डल्स प्रथम क्रमांक प्राप्त केला.
४×४०० मी. रिले मध्ये मुलींच्या संघाने प्रथम क्रमांकप्राप्त केला असून त्यात१) रेश्मा पांढरे२) क्षितिजा खरवत३) आर्या किडये
४) नियती पारकर यांचा समावेश होता
तसेच ४×१०० मी. रिले मध्ये मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला त्यात१) निर्जरा कांबळी२) दिक्षा झोरे३) दिक्षा सुर्वे
४) साबिया शेख यांचा समावेश होता.
यशस्वी विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थीनी विद्यार्थी खेळाडूंचा श्री. शैलेश पावसकर व प्राचार्य डाॅ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा.डॉ.हंबीरराव चौगले, प्रा.शंकर खोबरेकर, प्रा.डॉ.देवीदास हारगिले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.