25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

राष्ट्रवादी काँग्रेस बांदा शहर (शरद पवार गट) युवती अध्यक्षपदी सुनिता भाईप यांची निवड.

- Advertisement -
- Advertisement -

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहर राष्टवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) युवती शहर अध्यक्ष पदी सुनीता भाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)अध्यक्षा अर्चना घारे – परब यांच्या प्रेरणेतून सुनिता भाईप या गेली चार वर्षे राजकारण व समाजकारणात सक्रीय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांनी त्यांची या पदासाठी शिफारस केली होती. राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी युवती काॅग्रेस प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने सुनीता संजय भाईप यांची बांदा शहर युवती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सावंतवाडी रविंद्र मंगल कार्यालयात आयोजीत जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सायली पाटकर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहर राष्टवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) युवती शहर अध्यक्ष पदी सुनीता भाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)अध्यक्षा अर्चना घारे - परब यांच्या प्रेरणेतून सुनिता भाईप या गेली चार वर्षे राजकारण व समाजकारणात सक्रीय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांनी त्यांची या पदासाठी शिफारस केली होती. राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी युवती काॅग्रेस प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने सुनीता संजय भाईप यांची बांदा शहर युवती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सावंतवाडी रविंद्र मंगल कार्यालयात आयोजीत जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सायली पाटकर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!