25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचे शिरवंडेतील तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भरीव यश ; कु. निधी चंदन कांबळी, कु. वेदांत कुर्ले आणि कु. ब्रायन फर्नांडिस यांची अव्वल कामगिरी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिरवंडे येथे संपन्न झालेल्या मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने भरीव कामगिरी केली. यांत १०० मीटर धावणे प्रकारात १४ वर्षां खालील मुलींमधून कु. निधी चंदन कांबळी हिने पहिला क्रमांक प्राप्त केला.

४०० मीटर धावणे मध्ये कु. लौकिक श्रीगणेश मालवणकर याने दुसरा क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील उंचउडी मध्ये मुलांच्या गटातून कु. दीप भगवान लुडबे याने तिसरा क्रमांक तर गोळफेक प्रकारात कु. वेदांत कुर्ले आणि थाळीफेक मध्ये कु. ब्रायन फर्नांडिस यांनी प्रत्येकी पहिला क्रमांक पटकावला.

आता हे सर्व विद्यार्थी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मालवण तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे यांची प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी अभिनंदन करत प्रशंसा केली आहे आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिरवंडे येथे संपन्न झालेल्या मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने भरीव कामगिरी केली. यांत १०० मीटर धावणे प्रकारात १४ वर्षां खालील मुलींमधून कु. निधी चंदन कांबळी हिने पहिला क्रमांक प्राप्त केला.

४०० मीटर धावणे मध्ये कु. लौकिक श्रीगणेश मालवणकर याने दुसरा क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील उंचउडी मध्ये मुलांच्या गटातून कु. दीप भगवान लुडबे याने तिसरा क्रमांक तर गोळफेक प्रकारात कु. वेदांत कुर्ले आणि थाळीफेक मध्ये कु. ब्रायन फर्नांडिस यांनी प्रत्येकी पहिला क्रमांक पटकावला.

आता हे सर्व विद्यार्थी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मालवण तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे यांची प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी अभिनंदन करत प्रशंसा केली आहे आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!