बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे गावच्या श्री माऊली मंदिरात १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवात डेगवे गावाती विविध वाडीनिहाय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या नवरात्रोत्सवात प्रतिदिन श्री माऊली, ब्राह्मणी पंचायतन देवता़ची दुग्धाभिषेकाने पूजा करणे, देवतांना पुष्पहार घालणे, सकाळी, संध्याकाळी ८ वाजता आरती करणे, वाडी निहाय भजने, किर्तने सादर करणे, महिलांची फुगडी सादर करणे, भजनाची डबलबारी करणे, दशावतारी नाट्यप्रयोग सादर करणे इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत. शुक्रवारी २० ऑक्टोबरला श्री ब्राह्मणी इश्वटी प्रासादिक भजन मंडळ, आंबेखणवाडी यांचे रात्री ८ वाजता भजन व रात्री १० वाजता श्री गांगोबा दशावतारी नाट्य मंडळ ,ओवळीये यांचे पौराणिक नाटक प्रायोजित केले आहे.
या कार्यक्रमांना भाविकांनी, तसेच रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात डेगवे आंबेखणवाडी, फणसवाडी, जांभळवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी, वराडकरवाडी इत्यादी वाडी वस्ती वरील ग्रामस्थांची भजन मंडळे मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला यांची उपस्थिती असणार आहे.