मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या निवासस्थानी, आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी केली गेली. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती अथवा अपडेट शिबीर देखील आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला माजी नगरसेवक यतिन खोत यांच्यासह माजी नगरसेवक यतीन खोत यांसह माजी नगरसेविका दर्शना कासवकर, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा खोत, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर यांच्या सहकार्यातून शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकूण १३४ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी नंदा सारंग, शांती तोंडवळकर, तन्वी भगत, शुभम बारामते, दिया पवार तसेच अनंत पाटकर यांचे सहकार्य लाभले. शिबीर आयोजन करून दिले बाबत आमदार वैभव नाईक यांचे यतीन खोत व सौ. शिल्पा खोत यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
या शिबिरानंतर माजी बांधकाम सभापती यतीन खोत व युवती सेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा खोत यांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे व डिजीटल तंत्रज्ञांचेही आभार मानले. भविष्यातही सर्व सामाजिक दृष्ट्या अत्यावश्यक सेवांबद्दल आपण कार्यरत राहू अशी प्रतिक्रिया माजी बांधकाम सभापती यतीन खोत व युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी दिली.