25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरे सय्यद जुवा येथील संगीता नार्वेकर यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

एक बहुआयामी सामाजिक व्यक्तीमत्व हरपल्याने मालवण, मसुरे, बांदिवडे परिसरांत शोकाचे वातावरण..

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे सय्यद जुवा येथील रहिवासी आणि एलआयसी मालवण येथील प्रसिद्ध विमा सल्लागार सामाजिक कार्यकर्ते संगीता गणपत नार्वेकर यांचे बुधवारी ११ ऑक्टोबरला रात्री १० सुमारास निधन झाले. गुरुवारी दुपारी ११;३० वाजता बांदिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते येथील व्यापाऱ्यांनी, रिक्षा व्यवसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून संगीता यांच्या निधनाबद्दल दुखवटा पाळला.

संगीता यांच्या निधनाने मसुरे बांदिवडे गांवावरती शोककळा पसरली आहे. संगीता नार्वेकर ये मालवण तालुक्यात एलआयसी विमा सल्लागार होत्या. एलआयसी कंपनीच्या वतीने संगीता यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. नुकताच तिला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल मानवता विकास परिषदचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. गांवातील अनेक संस्थांमध्ये ती कार्यरत होती.

मसुरे, बांदिवडे गांवातील सामाजिक क्षेत्रामध्ये संगीता यांचे योगदान होते. तसेच कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेळोवेळी सर्वांना त्यांनी मदत केली होती. आर पी बागवे हायस्कूलच्या सांस्कृतिक कमिटीची ती सदस्या होती. गांवातील अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तिने वेळोवेळी शैक्षणिक मदत केली. गावातील धार्मिक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. गरीब गरजू कुटुंबांना एलआयसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा मोठ्या मदती मिळवून दिल्या होत्या. मालवण तालुक्यामध्ये सर्वांशी त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते.

कै. संगीता नार्वेकर यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार असून मालवण येथील प्रसिद्ध अशा पारिजात हॉटेलचे मालक शाम आणि सुंदर, युवा सामाजिक कार्यकर्ते संजय आणि शंकर तसेच त्या काळातील प्रसिद्ध युवक काँग्रेस नेते कै. राजू नार्वेकर यांच्ये त्या बहिण होत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!