23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आमदार गोपीचंद पडळकर धनगर जागर यात्रे निमित्त हेलिकॉप्टरने येणार सिंधुदुर्गात..!

- Advertisement -
- Advertisement -

सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात होणार धनगर जागर यात्रा ; कुठल्याही संघटनेचा व पक्षाचा झेंडा न घेता आयोजीत केलेली यात्रा.

जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे जास्तीत जास्त उपस्थितीचे सकल धनगर समाजाला आवाहन ; ही यात्रा राजकीय नसून या दरम्यान उपस्थित धनगर बांधवांना कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नसल्याचेही केले स्पष्ट.

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या १७ ऑक्टोबरला आयोजीत हेलिकॉप्टर दौऱ्याच्या नियोजनाबाबत व आमदार गोपीचंद पडळकर तसेच महाराष्ट्र राज्य दौरा प्रमुख शिवदास बिडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या धनगर जागर यात्रे बाबत १० ऑक्टोबरला आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयाच्या बाजुला सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या हॉलमध्ये बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.

या बैठकीला नवलराज काळे, शांताराम उर्फ बाळा गोसावी, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुरेश झोरे, मयूर चव्हाण,राजेश जानकर, सुशील खरात, रामचंद्र मसूरकर, प्रथमेश निकम, गुरुनाथ बबन आळे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी बैठकीबाबतचे नियोजन कसे असेल याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.
१७ऑक्टोबरला सकाळी ११ ते १२ समाज बांधवांची प्रवेश नोंदणी व चहा नाष्टा. १२ वाजता आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन. १२:१५ वाजता नियोजित बैठकीच्या ठिकाणी आगमन झाल्यावर उपस्थित महिला मंडळींच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचे औक्षण. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज पुण्यश्लोक, आहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, वंदन व दीप प्रज्वलन. आमदार गोपीचंद पडळकर यांचा घोंगडी फेटा श्रीफळ व धनगरी काठी देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार व उपस्थित मान्यवर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार स्वागत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे भाषण. आमदार गोपीचंद पडळकर यांचे मार्गदर्शन. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन.

या धनगर जागर यात्रेबद्दल जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी
धनगर समाजातील व भटके विमुक्त जाती जमाती मधील जागृत नेतृत्व यांनी समाज बांधवांची उपस्थिती वाढवण्याकरिता केले आवाहन केले आहे आणि समाज नेतृत्वाने आपापल्या तालुक्यातील समाज बांधवांना कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने समाज बंधू-भगिनी उपस्थित करण्याकरिता तालुकास्तरीय बैठका लावून नियोजन करावे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी देऊन, मोबाईल फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बैठकीचे निमंत्रण द्यावे असे सांगितले आहे. ही धनगर जागर यात्रा या बैठकीत ना कोणत्या पक्षाचा बॅनर, ना कोणत्या पक्षाचा झेंडा,ना कोणत्या संघटनेचा बॅनर फक्त सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्यातील बहुजनांमधील विधान परिषद सभागृहातील धनगर समाजाचा आवाज आमदार पडळकर हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे नवलराज काळे यांनी स्पष्ट केले आहे. हा दौरा हा राजकीय नसून सामाजिक दौरा आहे याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी. या बैठकीत कुठेही कोणत्याही पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही किंवा उपस्थित असणाऱ्या समाजाला कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही याची खात्री आणि हमी नवलराज काळे यांनी समाज बांधवांना आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे काम करायचे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे परंतु आपल्या समाजातील महाराष्ट्र राज्यातील एकमेव आमदार आपल्या जिल्ह्यात येत आहे त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत करणे धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती मधील समाज म्हणून आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न बाळगता आपण समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नवलराज काळे यांनी समाज बंधू-भगिनी यांना केले आहे. या बैठकी दरम्यान समाज संघटना, समाज बंधू-भगिनींना व गोपीचंद पडळकर यांच्या हितचिंतकांना विकास कामांबाबत काही निवेदने द्यावयाचे असल्यास लेखी स्वरूपात असलेले निवेदन आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे सुपूर्त करून त्यांचे स्वीय सहायक आबासाहेब कोकरे यांच्याकडून पोच घ्यावी असेही जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!