ब्यूरो न्यूज | देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शिवसेनेच्या (उ बा. ठा.)’होऊ द्या चर्चा अभियान’ उपक्रमाला काऊंटर ॲटॅक करणारे बॅनर भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आले आहेत. देवगड जामसंडे नगरपंचायत मागील २ वर्षांतील शिवसेना (उ. बा.ठा.) कार्यकाळातील अपयशी कारभारावर ‘होऊदेच’ चर्चा बॅनर बहुतांश ठिकाणी दिसत आहेत. या बॅनर्स मधून देवगड नगरपंचायतचा मागील २ वर्षाच्या कालावधीतील असमाधानकारक कारभाराबाबत आरोप करणारे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
शहरातील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी कधीही न झालेल्या वणवणीची होऊ देच चर्चा, कचरा व्यवस्थापनाचे अपयशी नियोजन, स्थानिक मच्छीविक्रेत्या महिलांची गैरसोय, मोकाट गुरांमुळे जनतेला होणारा नाहक त्रास, डास प्रतिबंधक धूर फवारणी न झाल्यामुळे होणारे डेंग्यू सारखे साथीचे रोग, जाहीर केलेल्या फसव्या विविध योजना, मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे होऊदेच चर्चा, बंद स्ट्रीट लाईटची होऊ देच चर्चा, स्वच्छता कर आणि आरोग्य कर वाढीची होऊ देच चर्चा, दोन वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची ‘होऊदेच’ चर्चा यांसारखे अनेक मुद्दे घेऊन देवगड जामसंडे शहर भाजप कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ‘होऊ दे चर्चा’ अभियानाला मुद्द्यांनी लक्ष वेधले जाऊन प्रत्युत्तर दिले गेले आहे.
फोटो सौजन्य | देवगड ब्यूरो