27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आता चीन कडून खरेदीची गरज नाही तर कच्चा माल वैभववाडीत उपलब्ध ; कोकण कृषी विद्यापिठाचे यशस्वी संशोधन देणार स्थानिक शेती व उद्योगांना चालना.

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | सहसंपादक : कोकण कृषी विद्यापीठाकडून झालेल्या संशोधनातून वैभववाडी तालुक्यात उपलब्ध होणारा अस्सल बोरबेट बांबू पासून उत्कृष्ट अगरबत्ती काडी तयार होते. या बाबत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाला यश आले आहे. त्या बांबू पासून उत्कृष्ट अगरबत्ती तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. अजय राणे, सहयोगी प्राध्यापक कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री यांनी बोलतांना दिली आहे.

एवढी वर्षे चीन आणि व्हियेतनाम देशातून वर्षाला १२ हजार कोटी रुपयांची अगरबत्ती काडी आपल्या देशात आयात होते.हा सर्व पैसा परदेशात जात होता. पण कोकणातल्या या हिरव्या सोन्यापासून दर्जेदार अगरबत्ती तयार होते हे कधी कोणाला उमगले नव्हते.त्या साठी विशिष्ट जातीचा बांबू लागतो. तो चीन मध्येच होतो. हा समज आता कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रयत्नामुळे दूर झाला आहे. कोकणात वाढणाऱ्या माणगा जातीच्या बांबू संशोधनानंतर आता वैभववाडी तालुक्यातील दर्जेदार बोरबेट बांबू पासूनही उत्कृष्ट अगरबत्ती काडी तयार होते. याचे नुकतेच कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे आणि त्याला चांगले यश आले आहे. यामुळे स्थानिक शेती व इतर व्यापार व उद्योजकतेला चालना मिळेल अशी खात्री व्यवसाय विश्लेषक व तज्ञांनी व्यक्त केली आहे.

बोरबेट बांबू हा दर्जेदार असल्याने त्याला मार्केट मध्ये मोठी मागणी आहे. इतर बांबूला फुलोरा येण्याचा धोका आहे. बोरबेट बांबूला कधीच फुलोरा येत नाही अशी माहिती वैभववाडी तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी छातीठोक पणे देत असतात. तसेच या बांबूचा व्यापारी उठाव तत्काळ होत असल्याने व्यापारी बोरबेट बाबूच्या लागवडीची प्राधान्याने शिफारस करतात.

कोकण कृषी विद्यापिठाने बोरबेट बांबूवर अगरबत्ती काडी बनविण्याचे संशोधन केल्यावर त्यांनी वैभववाडी तालुक्यात बोरबेट बांबू पासून अगरबत्ती काडी बनविण्याचे दहा लाख रुपये किमतीचे ५०% अनुदानावर युनिट देण्याची तयारी दर्शविली आहे. शेतकरी गट, आत्मा संस्था इत्यादींनी कोकण कृषी विद्यापीठाकडे संपर्क सांधण्याचे आवाहन केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाकडून या आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन युनिट तर रत्नागिरी जिल्ह्यात एक अगरबत्ती काडी बनविण्याची युनिट दिली गेली आहेत, या मुळे कोकणातील लोकांना रोजगार मिळणार आहे. अशी माहिती कोकण कृषी विद्यापिठाकडून देण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!