नागपूर | ब्युरो न्यूज : केंद्र सरकारच्या सचिवालय अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. ही नोकरी केंद्र सरकारी असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना भरभक्कम पगाराबरोबरच अनेक सोयी सुविधादेखील मिळणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
याठिकाणी उपक्षेत्र अधिकारी पदांच्या १२५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर आहे. अवर सचिव आणि कार्यालय प्रमुख, नॅशनल ऑथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन, कॅबिनेट सचिवालय, पहिला मजला, चाणक्य भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून विज्ञान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयातील पदव्युत्तर पदवी. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर आहे. अधिकृत वेबसाईट — https://cabsec.gov.in/