बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ‘बांदा – दाणोली’ मार्गावर विलवडे, वाफोली गावात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अती पावसामुळे रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे.
गणेश चतुर्थीपूर्वी या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर रस्ता वाहतुकिस सुरळीत करण्या संबधीत काहीच हालचाल दिसुन आली नाही. उलट रस्त्याची समस्या खुपच बिकट बनली आहे. विलवडे टेंबवाडी, सावंतवाडा येथे उतारावर दोन ठिकाणी मोठे खड्डे,काही महिन्यापुर्वी वाफोली धरणा नजीक डांबरीकरण केलेल्या पुलावर भलेमोठे खड्डे, तर वाफोली गांवाजवळील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरील जीवघेणे खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. वाहनचालकांसह प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.या खड्ड्यांमुळे रस्त्यावर हा वाहनांचा मार्ग आहे की नाही हेच कळत नाही आहे.या मार्गावरून वाहने चालवणे तारेवरची कसरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी संबधीत विभागाला एखाद्याचा बळी गेल्यावर जाग येणार का, नंतरच रस्ता दुरुस्त होऊन प्रवास सुरक्षित होणार का, असे सवाल वाहन चालकांकडून विचारलू जात आहेत. यापुढे या मार्गावर खड्ड्यामुळे अपघातात दुर्घटना घडल्यास संबधीत जबाबदारी घेणार का, असाही संतप्त सवाल स्थानिकांतून व्यक्त होत आहे.
रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक बनले आहे.शाळेतील विद्यार्थाना प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या संबधीत विभागाकडून गणपती पूर्वी तातपुरती मलमपट्टी केली. परंतु मुसळधार पावसाने मार्गावरील खड्ड्यांचा आकार मोठा झाला. विलवडे व वाफोली पूर्ण रस्त्याची चाळण झाली असून ठिकठिकाणी महाकाय खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबधित विभागाने तातडीने योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी वाहन चालकांकडून व नागरीकांकडून होत आहे.