26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कुडाळ व माणगांव येथे ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक व इतर ज्येष्ठ नेत्यांनी सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारवर केला हल्लाबोल.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज कुडाळ शिवसेना शाखेसमोर व माणगांव बाजार येथे ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!’ हे अभियान संपन्न झाले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आम्ही सर्वानी निवडून दिलेले सरकारच देशाला लुटत आहे. १२ लाखाचा सूट आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी घातला नाही. जनतेच्या पैशाची लूट सुरु असून भाजप विरोधात कोणी आवाज उठविला तर त्याच्यावर कारवाई करून आवाज दाबला जातो. आम्ही करू तो कायदा या अविर्भावात लोकशाही असलेला देश हुकुमशाहीकडे नेला जात आहे. प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याचे काय झाले? शिवस्मारक उभारले का? फरार झालेल्या दाऊद व मल्ल्याला देशात आणले जाणार होते त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित करून अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी भाजप वर सडकून टीका केली.

यावेळी उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत.ना महागाई कमी झाली, ना रोजगार वाढला, ना भ्रष्टाचार कमी झाला. अदानी आणि अंबानी मात्र जगातील श्रीमंत व्यक्ती झाले.राज्यातील प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. पेट्रोल, डिझेल,गॅस, टॉमेटो,तूरडाळ इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. कोणत्याही राज्यात इतर पक्षाचे सरकार आले कि सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून, शर्तीचे प्रयत्न करून ते सरकार पाडायचे आणि भाजप सरकार आणायचे हेच काम भाजप पक्षाने केले आहे. सत्तेची हाव त्यांना झाली आहे. संविधान टिकले पाहिजे तर भाजपला सत्तेतून हटविलेच पाहिजे.कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना मोदींच्या विरोधात दिल्लीत उपोषण करावे लागले हि शोकांतिका आहे.

आमदार वैभव नाईक म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेऊ, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण देऊ, रोजगार मिळवून देऊ,शासकीय भरत्या करू अशी एक ना अनेक आश्वासने भाजपने दिली मात्र यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था नांदेड पेक्षा वेगळी नाही. रुग्णालयात औषध खरेदीच केलेली नाही.चिपी विमानतळ बंद केले जात आहे. गावागावातील छोट्या रस्त्यांसाठी आवश्यक असलेला निधी राणेंनी आपल्या हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वळवला. बेरोजगारी वर सरकार चक्कार शब्द काढत नाही. दिड लाख शासकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे कंत्राट भाजप आमदारांच्या आणि निकटवर्तीयांच्याच ९ कंपन्यांना दिले आहे. ५ वर्षानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल. ४०० पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना काळात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लाखो रुग्णांना बरे करण्याचे काम झाले. शिंदेचे आमदार त्यावेळी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना कंटाळून सत्तांतर केल्याचे सांगतात मात्र आज अजित पवार यांच्याच मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. जिल्हाप्रमुख संजय पडते,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या आश्वासनांचा आणि योजनांच्या अपयशांचा आढावा घेतला.

कुडाळ शहर येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट,माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,नगरसेवक उदय मांजरेकर,नगरसेविका श्रेया गवंडे, श्रृती वर्दम, ज्योती जळवी, सई काळप,सचिन काळप,राजू गवंडे दीपक आंगणे, आबा मुंज आदी.

माणगांव येथे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, महिला तालुका प्रमुख मथुरा राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, रामा धुरी,विभाग संघटक कौशल जोशी, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, पप्पू म्हाडेश्वर, रमाकांत धुरी, अशपाक कुडाळकर, कालेली सरपंच आरोही चव्हाण, घावनळे सरपंच आरती वारंग, माजी उपसरपंच दिनेश वारंग, वसुली सरपंच अजित परब, उपसरपंच गवस, शिवापूर उपसरपंच महेंद्र राऊळ, नेरूर क नारुर उपसरपंच परब, सद्गुरू घावनळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार वैभव नाईक व इतर ज्येष्ठ नेत्यांनी सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारवर केला हल्लाबोल.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज कुडाळ शिवसेना शाखेसमोर व माणगांव बाजार येथे 'होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!' हे अभियान संपन्न झाले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आम्ही सर्वानी निवडून दिलेले सरकारच देशाला लुटत आहे. १२ लाखाचा सूट आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी घातला नाही. जनतेच्या पैशाची लूट सुरु असून भाजप विरोधात कोणी आवाज उठविला तर त्याच्यावर कारवाई करून आवाज दाबला जातो. आम्ही करू तो कायदा या अविर्भावात लोकशाही असलेला देश हुकुमशाहीकडे नेला जात आहे. प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याचे काय झाले? शिवस्मारक उभारले का? फरार झालेल्या दाऊद व मल्ल्याला देशात आणले जाणार होते त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित करून अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी भाजप वर सडकून टीका केली.

यावेळी उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत.ना महागाई कमी झाली, ना रोजगार वाढला, ना भ्रष्टाचार कमी झाला. अदानी आणि अंबानी मात्र जगातील श्रीमंत व्यक्ती झाले.राज्यातील प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. पेट्रोल, डिझेल,गॅस, टॉमेटो,तूरडाळ इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. कोणत्याही राज्यात इतर पक्षाचे सरकार आले कि सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून, शर्तीचे प्रयत्न करून ते सरकार पाडायचे आणि भाजप सरकार आणायचे हेच काम भाजप पक्षाने केले आहे. सत्तेची हाव त्यांना झाली आहे. संविधान टिकले पाहिजे तर भाजपला सत्तेतून हटविलेच पाहिजे.कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना मोदींच्या विरोधात दिल्लीत उपोषण करावे लागले हि शोकांतिका आहे.

आमदार वैभव नाईक म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेऊ, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण देऊ, रोजगार मिळवून देऊ,शासकीय भरत्या करू अशी एक ना अनेक आश्वासने भाजपने दिली मात्र यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था नांदेड पेक्षा वेगळी नाही. रुग्णालयात औषध खरेदीच केलेली नाही.चिपी विमानतळ बंद केले जात आहे. गावागावातील छोट्या रस्त्यांसाठी आवश्यक असलेला निधी राणेंनी आपल्या हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वळवला. बेरोजगारी वर सरकार चक्कार शब्द काढत नाही. दिड लाख शासकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे कंत्राट भाजप आमदारांच्या आणि निकटवर्तीयांच्याच ९ कंपन्यांना दिले आहे. ५ वर्षानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल. ४०० पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना काळात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लाखो रुग्णांना बरे करण्याचे काम झाले. शिंदेचे आमदार त्यावेळी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना कंटाळून सत्तांतर केल्याचे सांगतात मात्र आज अजित पवार यांच्याच मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. जिल्हाप्रमुख संजय पडते,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या आश्वासनांचा आणि योजनांच्या अपयशांचा आढावा घेतला.

कुडाळ शहर येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट,माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,नगरसेवक उदय मांजरेकर,नगरसेविका श्रेया गवंडे, श्रृती वर्दम, ज्योती जळवी, सई काळप,सचिन काळप,राजू गवंडे दीपक आंगणे, आबा मुंज आदी.

माणगांव येथे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, महिला तालुका प्रमुख मथुरा राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, रामा धुरी,विभाग संघटक कौशल जोशी, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, पप्पू म्हाडेश्वर, रमाकांत धुरी, अशपाक कुडाळकर, कालेली सरपंच आरोही चव्हाण, घावनळे सरपंच आरती वारंग, माजी उपसरपंच दिनेश वारंग, वसुली सरपंच अजित परब, उपसरपंच गवस, शिवापूर उपसरपंच महेंद्र राऊळ, नेरूर क नारुर उपसरपंच परब, सद्गुरू घावनळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!