बहुसंख्य १२ बलुतेदारही रहाणार उपस्थित.
आचरा | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने उद्या ५ ऑक्टोबरला शरद कृषी भवन, ओरोस येथे विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील जास्तीत जास्त विविध क्षेत्रातील कारागीर उपस्थित राहण्यासाठी भाजपा कार्यालय ओरोस येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद मेस्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. मेळाव्याला बहुसंख्य बाराबलुतेदार उपस्थित राहतील अशी माहिती आनंद मेस्री यांनी दिली.
देशातील सुतार, कुंभार, धोबी, नाभिक, मुर्तिकार, शिल्पकार अशा बारा बलुतेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ३० लाख कारागीरांचे नशीब पी एम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने नविन विश्वकर्मा योजनेला मंजुरी देऊन १३ हजार कोटी ची तरतूद केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा पारंपरिक कारागीरांना होणार आहे. विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागिर व कारागिरांच्या क्षमता वाढविणे हा आहे. या योजने अंतर्गत कुशल कारागीरांना एम एस एम ई म्हणजेच सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळणार आहे.
या बैठकीला सुतार समाज नेते प्रकाश मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, राजू मेस्त्री, महेश मेस्त्री बाळकृष्ण मेस्त्री, विठोबा सुतार, रितेश सुतार, नारायण सुतार, शंकर मेस्त्री, रामदास मेस्त्री, मधुसूदन मेस्त्री, सोमा मेस्त्री, अंकुश मेस्त्री, रामचंद्र मेस्त्री, शेखर मेस्त्री, विजय मेस्त्री आदी उपस्थित होते.