शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आमदार वैभव नाईक यांचा उपक्रम.
श्री यतीन खोत ( माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक, मालवण नगरपरिषद
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निवासस्थानी, कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती अथवा अपडेट शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.
माजी नगरसेवक यतिन खोत यांच्या धुरीवाडा मालवण येथील निवासस्थानी शुक्रवारी ६ ऑक्टोबर सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक बांधकाम कामगार नोंदणी ,आधारकार्ड नोंदणी – दुरुस्ती शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा खोत, भाई कासवकर या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बांधकाम कामगार नोंदणी करिता खालील नमूद कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
(सर्व मूळ तथा ओरिजनल कागदपत्रे लागतील.)
१) फोटो
२) आधार कार्ड
३) बँक पासबुक
४) रेशन कार्ड
५) नगरपालिका दाखला
६) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
१) मतदान कार्ड
२) पनकार्ड
३) पासपोर्ट
४) शाळा सोडल्याचा
५) सर्व्हिस ओळखपत्र शासकीय
६) ड्रायव्हिंग लायसन्स
७) पासबुक
८) शाळा ओळखपत
(यांपैकी कोणताही एक)
पत्ता पुरावा –
१) मतदान कार्ड
२) बँक पासबुक
३) लाईटबिल …( ३ महिन्याच्या आतील)
५) इन्शुरन्स पॉलिसी
५) ड्रायव्हिंग लायसन्स
६) पासपोर्ट फोटो
७) पाण्याचे बिल (३ महिन्याच्या आत)
(यांपैकी कोणताही एक )
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन माजी नगरसेवक यतीन खोत ( ९४२२५८४६४१) व ( सौ. शिल्पा खोत :(९३२६४७७७०७) यांनी केले आहे.