संपूर्ण सामाजिक विषयांसाठी व तालुक्यातील विकास कामांबाबतही भेट असेल असे विकास मंच अध्यक्ष सुरेश पाटील यांचे स्पष्टीकरण.
नवलराज काळे | सहसंपादक : ‘एकंच आशा, विकासाची दिशा’ हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून वैभववाडी तालुका विकास मंच तालुक्यात सर्व घटकांना सर्व समाज धर्मांना एकत्र करत काही विकासात्मक आणि विधायक काम करत असून विकास मंच च्या ध्येयधोरणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांची आज ४:३० वाजता दादर येथे वैभववाडी तालुका विकास मंचचे पदाधिकारी भेट घेणार आहेत. तसेच पुढील आठवड्यात कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वैभववाडी तालुक्यातील विकास कामांची निवेदन देण्यात येणार आहेत.
निवेदनातील ठळक विषय खालील प्रमाणे असतील.
१) भुईबावडा, उंबर्डे, कुसूर, कुंभवडे आणि सोनाळी या पंचक्रोशीत नवीन मोबाईल टॉवर बसवणे.
२) वैभववाडी रेल्वे स्थानकात शेड बसवून घेणे.
३) वैभववाडी स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस आणि मंगलोर एक्स्प्रेस यांना थांबा देणे आणि वैभववाडी येथील टिकीट कोटा वाढवून घेणे.*
४) कुसूर (पिंपळवाडी) ते वैभववाडी रेल्वे स्टेशन रोड (व्हाया नापणे) डांबरीकरण करणे.
५) तरेळे ते वैभववाडी या रस्त्याचे डांबरीकरण करणे.
या सहित तालुक्यातील इतर ही काही महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष वेदना असल्याची माहिती तालुका विकास मंच अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली असून वरील नियोजित वेळी तालुक्यातील विकास महान सदस्यांना उपस्थित राहायचे असल्यास खालील नंबर वरती संपर्क करावा असे आव्हान देखील सुरेश पाटील यांनी केले.
सुरेश पाटील (अध्यक्ष) – 9137903740
विठ्ठल मासये (सचिव) – 8879476044
चंद्रकांत रासम (खजिनदार) – 9920738510
विठ्ठल तळेकर (उपाध्यक्ष) – 8879050769