संतोष साळसकर | सहसंपादक : आत्ता गेले २४ तास स्वतः कोकण रेल्वेत अनेक जणांसोबत मी जा काय भोगलंय ता आपली रेल्वे प्रशासनाची आपत्ती व्यवस्था कशी आसा ता सिद्ध करणारी आसा.मी काल संध्याकाळी ओखा ट्रेन ने कणकवली हून मुंबईक येवक निघालंय पण अजून मी २४ तास उलटानही पोचाक नाय आसंय.
कोकण रेल्वेत बहुतेक प्रसंगात कोकणवासीय भराडले जातत याची पुन्हा एकदा प्रचिती इली. नुसती प्रचिती नाय तर प्रवाश्यांचे तर मुला लेकरांचे, आई बहिणींचे हालहाल झाले. मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोली या ठिकाणी, काल शनिवारी एका मालगाडीचे ५ डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसारले. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेळापत्रक शाप कोलमाडला. लांब पल्ल्याचे एक्स्प्रेस खोळंबल्याने प्रवाशांची इटमना झाली.
यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तसेच गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची फारच गैरसोय झाली व काहींची चालू आसा. मध्य रेल्वेचो ढिसाळ आणि निरीच्छ कारभार पुन्हा सगळ्यांका दिसलो. काल दुपारी ३ वाजता झालेल्या अपघातानंतर मुंबईवरून कोकणात जाउच्यासाठी काही एक्सप्रेस ट्रेन सोडल्यानी खरे पण त्याच वेळेक उत्तरेकडून देखील काही एक्सप्रेस ट्रेन इले आणि १७ ते १८ ट्रेन जवळपास १३ तासांपासून जयच्या थय रखाडले. १२ ते १३ तासांपासून प्रवासी ट्रेनमध्येच अडकान पडले. नावडे रोड रेल्वे स्थानकात दादर-सावंतवाडी ही एक्सप्रेस ट्रेन उभी होती. ट्रेनमध्ये पाणी नाय की पोटाक अन्न नाय. औषधांची तर सोयच सोडा. पंखे बंद पडले, एसी कोचमधील एसी देखील बंद..! शौचालयातील पाणी देखील नाय ओ….! यामुळे प्रवाशांचे अक्षरशः हाल हाल झाले.
बरा सगळ्यात संतापजनक म्हणजे ट्रेन कधी सुरू होतली याची माहिती प्रवाशांका देवची सोयही करुक नाय . प्रसार माध्यमांना देखील याबाबत नीटशी माहिती देऊक नाय. मध्य रेल्वे प्रशासन स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमात व्यस्त असल्याचा चित्र सध्या दिसता. जनसंपर्क विभाग त्या कार्यक्रमाचे अपडेट जरुर देतं ह्या पण ट्रेनचा अपडेट दिले गेले काय..?
या सगळा मी आणि हजारो प्रवांशांनी स्वतः त्या रेल्वे गाडीत प्रवास करताना अनुभवलंय म्हणान इतक्या थेट व प्रत्यक्ष भोगलंव म्हणान सांगलंय.
संतोष साळसकर, सहसंपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.