मालवण | सुयोग पंडित : ‘सिंधुरत्न फाऊंडेशन’ महाराष्ट्रच्या अध्यक्षा व सिने अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रमात जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयुरा भंडारे , मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे , रविकिरण शिरवलकर,अनिल कांबळी , सिद्धेश कांबळी , अनुज कांबळी, हिंदरत्न डॉ सुभाष भंडारे उपस्थित होते.
यावेळी सुभाष भंडारे आणि अनिल कांबळी यांनी आर्थिक मदत केली. या आश्रमात एकूण ४५ ज्येष्ठ नागरीक आहेत. यावेळीअक्षता कांबळी यांनी आश्रमातील आजी -आजोबा यांना मालवणी गजाली सांगून आणि सध्या सन मराठीवर ‘वेतोबा’ मालिकेतील गांवमामीचे सर्व प्रसिद्ध वाक्य बोलून सर्वाना हसवले. काही आजी आजोबा यांनी गाणी म्हणून दाखवली. डॉ सुभाष भंडारे व सिद्धेश कांबळी यांनी गाणी म्हणत आजी -आजोबांना आनंदीत केले .
यावेळी आश्रमाचे सर्वेसर्वा संदेश शेट्ये व सर्व कर्मचारी यांनी सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र यांचे आणि अक्षता कांबळी व सर्वांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.