24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

स्वतः चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी काही लोकांना सवय आहे पण आपण तसे कधीच करत नाही : उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत.

- Advertisement -
- Advertisement -

योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ; किरण उर्फ भैय्या
शेठ सामंत यांनी वाॅटस् ॲप डि पी संदर्भात केला विरोधकांवर शाब्दिक पलटवार.

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे संचालक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांनी त्यांच्या ‘वाॅटस् ॲप डि पी’ संदर्भात विरोधकांवर प्रतिहल्ला चढवला आहे. उलट सुलट चर्चा करणारे विरोधक तथा
काही लोक खरे बोलण्याचा आव आणतात. आपण कधीही खोटे बोलत नाही. योग्य वेळी ‘सडेतोड उत्तर मिळेलच’ असे प्रतिपादन त्यांनी केले.

काल गुरुवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी आपल्या डि पिवर एक स्टेटस ठेवले होते. त्यावरून संपूर्ण राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आज शुक्रवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी रत्नागिरीत प्रतिक्रिया दिली.

स्वतः चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी काही लोकांना सवय आहे. मी मात्र तसे करत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मी कधीही खोटे वागत नाही, खोटे बोलत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. मी ते स्टेटस बदलले त्याचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वर्षभरातच मी संपर्कात आलो आहे. या वर्षभरातच मला समजले की त्यांच्या इतका भावनाशील माणूस कुणीही नाही अशीही प्रतिक्रिया उद्योजक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी व्यक्त दिली आहे.

फोटो सौजन्य | रत्नागिरी ब्युरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ; किरण उर्फ भैय्या
शेठ सामंत यांनी वाॅटस् ॲप डि पी संदर्भात केला विरोधकांवर शाब्दिक पलटवार.

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे संचालक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांनी त्यांच्या 'वाॅटस् ॲप डि पी' संदर्भात विरोधकांवर प्रतिहल्ला चढवला आहे. उलट सुलट चर्चा करणारे विरोधक तथा
काही लोक खरे बोलण्याचा आव आणतात. आपण कधीही खोटे बोलत नाही. योग्य वेळी 'सडेतोड उत्तर मिळेलच' असे प्रतिपादन त्यांनी केले.

काल गुरुवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी आपल्या डि पिवर एक स्टेटस ठेवले होते. त्यावरून संपूर्ण राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आज शुक्रवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी रत्नागिरीत प्रतिक्रिया दिली.

स्वतः चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी काही लोकांना सवय आहे. मी मात्र तसे करत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मी कधीही खोटे वागत नाही, खोटे बोलत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेना युतीचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. मी ते स्टेटस बदलले त्याचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वर्षभरातच मी संपर्कात आलो आहे. या वर्षभरातच मला समजले की त्यांच्या इतका भावनाशील माणूस कुणीही नाही अशीही प्रतिक्रिया उद्योजक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी व्यक्त दिली आहे.

फोटो सौजन्य | रत्नागिरी ब्युरो

error: Content is protected !!