25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अखेर एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाचे शिलेदार जाहीर ; दुखापतीमुळे फाॅर्ममध्ये असलेल्या अष्टपैलूला संधी मिळू शकली नाही.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी इतर सर्व देशांनी आपापल्या टीम्सची घोषणा केली होती, परंतु भारताने आपला संघ जाहीर केला नव्हता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ चे बिगुल ५ ऑक्टोबरला वाजणार आहे. सर्व १० संघांना २-२ सराव सामने खेळायचे आहेत. टीमच्या खेळाडूंच्या बदलांची अखेरची तारीख २८ सप्टेंबर देण्यात आली होती. याच दिवशी भारताने आपला संघ जाहीर केला आहे.

भारतीय संघाने मोठा बदल केला आहे. फाॅर्ममध्ये असूनही दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही अश्विनला संधी देण्यात आली होती. भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी २ सराव सामने खेळायचे आहेत. संघाला ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे अंतिम शिलेदार:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शमी आणि शार्दुल ठाकूर.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी इतर सर्व देशांनी आपापल्या टीम्सची घोषणा केली होती, परंतु भारताने आपला संघ जाहीर केला नव्हता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ चे बिगुल ५ ऑक्टोबरला वाजणार आहे. सर्व १० संघांना २-२ सराव सामने खेळायचे आहेत. टीमच्या खेळाडूंच्या बदलांची अखेरची तारीख २८ सप्टेंबर देण्यात आली होती. याच दिवशी भारताने आपला संघ जाहीर केला आहे.

भारतीय संघाने मोठा बदल केला आहे. फाॅर्ममध्ये असूनही दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही अश्विनला संधी देण्यात आली होती. भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी २ सराव सामने खेळायचे आहेत. संघाला ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे अंतिम शिलेदार:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शमी आणि शार्दुल ठाकूर.

error: Content is protected !!