23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी दीपा ताटे आणि उपाध्यक्षपदी नेहा कोळंबकर.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गच्या अध्यक्ष पदी दिपा ताटे तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नेहा कोळंबकर यांची निवड झाली आहे. कुडाळ तालुका अध्यक्ष पदी तन्वी सावंत, कणकवली तालुका अध्यक्षपदी स्नेहा शेळके यांची निवड पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे, महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, कार्याध्यक्ष सन्मा श्रृती उरणकर यांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करण्यात आली.

दिपा ताटे यांनी गेली ३ वर्षे कुडाळ तालुका अध्यक्ष पद सांभाळून वेगवेगळे सामाजिक उपक्रम तसेच महिलांना पूरक कामे करून तालुक्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला याची नोंद वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांची निवड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदी एकमताने करण्यात आली. त्याचबरोबर रक्तदान शिबीरांमध्ये पुढाकार घेणाऱ्या आणि अनेक उपक्रम राबविणाऱ्या कोळंब येथील युवा सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा उद्योजिका नेहा कोळंबकर यांची निवड जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी करण्यात आली.

गेली ३ वर्ष कुडाळ समिती सदस्य म्हणून कामात अग्रेसर असणाऱ्या तन्वी सावंत यांची निवड कुडाळ तालुका अध्यक्ष पदी करण्यात आली. तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून पाठबळ देणाऱ्या स्नेहा शेळके यांची कणकवली तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व महिलावर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही समिती जिल्ह्यातील महिलांसाठी कार्यरत असून महिलांचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा या समितीचा मानस असतो. अनेक महिलांना या समितीने न्याय मिळवून दिला आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही या समितीचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दीपा ताटे म्हणाल्यात मला मिळालेले हे पद माझे एकट्याचे नसून मला नेहमी सहकार्य करणाऱ्या या समितीतील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे तसेच माझ्यासोबत नेहमी काम करणाऱ्या माझ्या सहकारी महिलांचे आणि माझ्या परिवाराचे आहे. मिळालेल्या पदाचा उपयोग करून तळागाळातील महिलांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. तर उपाध्यक्ष नेहा कोळंबकर म्हणाल्या आपल्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात समाजातील उपेक्षित महिलांना तसेच या सर्व महिला वर्गाला सामाजिक क्षेत्रात योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना विविध क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहील.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!