शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला उपजिल्हा संघटक तथा माजी नगरसेविका सेजल परब यांच्या मार्गदर्शनानुसार सन्मेश परब व तपस्वी मयेकर यांच्या पाठपुराव्याने होत आहे विविध कामांची कार्यवाही .
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दांडी झालझुल वाडी येथील एका महत्वाच्या समस्येचे निराकरण झाले आहे. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर , महिला उपजिल्हा संघटक तथा माजी नगरसेविका सेजल परब यांच्या मार्गदर्शनानुसार सन्मेश परब व तपस्वी मयेकर यांच्या पाठपुराव्याने मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात अधिक सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील हायमास्ट व स्ट्रीट लाईट दुरुस्ती व अन्य कामे सुरु आहेत व कार्यवाही होत आहे.
दांडी झालझुल वाडी कुबल रापण संघ या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर दुरुस्ती करून त्या ठिकाणी नवीन जास्त क्षमतेच्या लाईट्स बसवून कार्यान्वित करून दिल्याबद्दल मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच प्रशासनाचे, सन्मेश परब व तपस्वी मयेकर यांचे स्थानिक ग्रामस्थ जयदेव लोणे, श्री.दिलीप सारंग, राजा सारंग, पांड्या सारंग, सत्यविजय खवणेकर, नारायण लोणे, जयसिंग पराडकर, विठ्ठल खवणेकर, विशाल सारंग, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर व इतर ग्रामस्थ मंडळींनी आभार व्यक्त केले आहेत.