मालवण | प्रतिनिधी : ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ च्या वतीने गणेशोत्सव २०२३ साठी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत केवळ घरगुती व ‘इको फ्रेंडली’ गणेश सजावट या प्रमुख अटी आहेत.
यासाठी स्पर्धकांनी आपल्या घरच्या गणेश सजावटीचा १ मिनिटाचा व्हिडिओ रेकाॅर्ड करुन आयोजकांकडे ९९७५५५६०७३ व ७२६३८५९२३५ या वाॅटस् ॲप क्रमांकांवर पाठवायचा आहे. पाठवणार्यांनी आपले नांव , पत्ता या सोबत हा व्हीडीओ पाठवायचा आहे. हा व्हिडिओ लॅन्डस्केप मोडमध्ये ( मोबाईल आडवा धरून) चित्रीत करुन पाठवावा असे आयोजन समितीकडून सांगण्यात आले आहे.
स्पर्धेच्या विजेत्यांना रुपये १५०१ व चांदीचे फूल तर उपविजेत्यांना रुपये १००१ व चांदीचे नाणे अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी तज्ञ परीक्षकांचाच निर्णय अंतिम राहील यांची स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये ९९/_ असून ते व्हिडिओ सोबत वरील क्रमांकावर GPay करुन पाठवलेल्या व्हिडिओ सोबत त्याचा स्क्रीनशाॅट पाठवायचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ हे आपली सिंधुनगरी चॅनेलच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर प्रसारित केले जाणार असून जास्तीत जास्त गणेश भक्तांनी आपापल्या घरचे व्हिडिओ चित्रीत करुन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आपली सिंधुनगरी क्रिएटीव्ह टीमने केले आहे. स्पर्धेचा निकाल २ ऑक्टोबर २०२३ ला जाहीर केला जाणार आहे.