भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांनी केले उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील पावनाई देवी महिला दूध उत्पादक संस्था बांदिवडे या संस्थेच्या वतीने येथील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ५ लिटर गोडेतेल आणि टी-शर्ट चे मोफत वाटप करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गाई म्हशींचे पालन केल्यास दुधातून या भागात क्रांती घडेल असे प्रतिपादन मसुरे येथे बोलताना भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
येथील पाहुणाई देवी महिला दूध उत्पादन संस्था मसुरे बांदिवडे या संस्थेच्या वतीने येथील दूध उत्पादन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती डॉक्टर विश्वास साठे आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ अल्का साठे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली
पाच लिटर गोडेतेल आणि टी-शर्ट याचे मोफत वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे शंभर दूध उत्पादित शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. यावेळी बोलताना डॉक्टर विश्वास साठे म्हणालेत पावनाही देवी महिला दूध उत्पादन संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी दूध उत्पादित शेतकऱ्यांसाठी अनोखे उपक्रम आणि सर्व प्रकारची मदत दिली जाते. या सर्व शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढावे आणि त्यातून त्यांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी ही संस्था या सर्व शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. भविष्यामध्ये या परिसरामध्ये दुधाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवण्याचा मानस व्यक्त केला. यानंतर येथील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी कोणत्या गोष्टीची खबरदारी घेणे जरुरी आहे आणि आपल्या सर्व जनावरांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी तसेच बायोगॅस निर्मितीसाठी शासनाकडून कोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्रसाद देवधर यांनी केले.
उपस्थित सर्व दूध उत्पादित शेतकऱ्यांनी डॉक्टर प्रसाद देवधर यांना विविध प्रश्न विचारून शंका निरसन केलि. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अलका साठे, पांडुरंग ठाकूर, रमेश पाताडे, सचिन गोलतकर, सतीश बांदिवडेकर, आबा घाडीगांवकर, अभी दुखंडे, तुळशीदास चव्हाण, मोहम्मद खान, उमेश बागवे, शामा सावंत, आबा मसुरकर, धोंडी शिंदे, कृष्णा गिरकर, मुबारक मीर, स्वप्निल ठाकूर, विकास ठाकूर, भारती सावंत, दशरथ नार्वेकर, आबा अहिर, निलेश लोके, संतोष घाडीगावकर, हेमंत बागवे आदी बहुसंख्य दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत डॉक्टर साठे यांनी केले. उपस्थित सर्व दूध उत्पादित शेतकऱ्यांनी डॉक्टर विश्वास साठे आणि पावनाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या मोफत तेल आणि टी-शर्ट वाटप या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.