24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार नितेश राणे यांनी भूस्खलन झालेल्या भोरपी गोपाळ समाज वस्तीला भेट देऊन घेतला आढावा ; व्यथा जाणून घेऊन लवकरच पुनर्वसन करण्यात येईल असा दिला विश्वास.

- Advertisement -
- Advertisement -

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाजाच्या ‘तावडे वाडी’ या छोट्या वसाहतीत ४ दिवसांपूर्वी भूस्खलन झाले होते. येथील भोरपी गोपाळ समाज बांधव राहत असलेल्या डोंगर भागातील वस्तीत नुकतेच भूस्खलन होऊन झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काल संध्याकाळी आमदार नितेश राणे यांनी खारेपाटणला भेट दिली. तिथल्या नागरिकांचे लवकरच नविन जागेत पुनर्वसन करण्यात येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

यावेळी कणकवली तहसीलदार श्री देशपांडे, भाजप कार्यकर्ते शरद कर्ले, माजी जि.प. सदस्य रवींद्र जठार, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, नडगिवे सरपंच माधवी मणयार, उपसरपंच भूषण कांबळे, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, नडगीवे माजी सरपंच मण्यार भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, माजी पं.स सदस्य तृप्ती माळवदे तसेच सर्कल श्रीम बावलेकर, तलाठी श्रीम अरुणा जयानावर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाज राहत असलेल्या तावडे वाडीत भूस्खलन होऊन येथील घरांच्या जमीन भगाला भेगा गेल्या होत्या तर काही दरड भाग कोसळला होता. यामुळे येथील ५ घरातील ६ कुटुंबाची एकूण ३३ माणसे भयभीत झाली होती. जिल्हा प्रशासन व खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने या नागरिकांची तात्पुरती दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज आमदार नितेश राणे यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून येथील नागरिकांची भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत तसेच कणकवली तहसीलदार आणि त्यांचे प्रशसान सहकारी यांनी तत्परता दाखवून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले बद्दल त्यांची प्रशंसा केली. या नागरिकांचे लवकरच प्रशासनाच्या वतीने सुरक्षित जागेत पुनर्वसन करन्यात येईल व तूना पक्की घरे बांधून देण्यात येथील असे सांगितले. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने भूखंड उपलब्ध करून लवकरात लवकर कागदपत्रे पूर्ण करून दिली तर या लोकांना लवकरच नवीन घरे बांधून त्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल असे सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाजाच्या 'तावडे वाडी' या छोट्या वसाहतीत ४ दिवसांपूर्वी भूस्खलन झाले होते. येथील भोरपी गोपाळ समाज बांधव राहत असलेल्या डोंगर भागातील वस्तीत नुकतेच भूस्खलन होऊन झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काल संध्याकाळी आमदार नितेश राणे यांनी खारेपाटणला भेट दिली. तिथल्या नागरिकांचे लवकरच नविन जागेत पुनर्वसन करण्यात येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

यावेळी कणकवली तहसीलदार श्री देशपांडे, भाजप कार्यकर्ते शरद कर्ले, माजी जि.प. सदस्य रवींद्र जठार, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, नडगिवे सरपंच माधवी मणयार, उपसरपंच भूषण कांबळे, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, नडगीवे माजी सरपंच मण्यार भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, माजी पं.स सदस्य तृप्ती माळवदे तसेच सर्कल श्रीम बावलेकर, तलाठी श्रीम अरुणा जयानावर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाज राहत असलेल्या तावडे वाडीत भूस्खलन होऊन येथील घरांच्या जमीन भगाला भेगा गेल्या होत्या तर काही दरड भाग कोसळला होता. यामुळे येथील ५ घरातील ६ कुटुंबाची एकूण ३३ माणसे भयभीत झाली होती. जिल्हा प्रशासन व खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने या नागरिकांची तात्पुरती दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज आमदार नितेश राणे यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून येथील नागरिकांची भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत तसेच कणकवली तहसीलदार आणि त्यांचे प्रशसान सहकारी यांनी तत्परता दाखवून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले बद्दल त्यांची प्रशंसा केली. या नागरिकांचे लवकरच प्रशासनाच्या वतीने सुरक्षित जागेत पुनर्वसन करन्यात येईल व तूना पक्की घरे बांधून देण्यात येथील असे सांगितले. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने भूखंड उपलब्ध करून लवकरात लवकर कागदपत्रे पूर्ण करून दिली तर या लोकांना लवकरच नवीन घरे बांधून त्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल असे सांगितले.

error: Content is protected !!