खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण गांवात दरवर्षी अनेक चाकरमानी या ठिकाणी येत असतात. खारेपाटण बाजारपेठेत पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी येत असतात. गणेश चतुर्थीच्या कालावधीत खारेपाटण शहर हे अत्यंत गजबजलेलं असते. या कालावधीत कोणतीही आपत्ती, अडचण, त्रास, गणेशभक्त किंवा इतर सर्वच नागरिक यांना होऊ नये सर्व व्यवस्था व वातावरण सुरक्षित तसेच सुव्यवस्थित राहावे यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत सह इतर सर्व यंत्रणा ही सतर्क असली पाहिजे. यासाठी उद्या १५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य,पोलीस यंत्रणा,आरोग्य यंत्रणा, विजवितरण यंत्रणा, व्यापारी , रिक्षा संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
या बैठकीत सर्वच यंत्रणेला गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच इसवलकर यांनी दिली.