मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या कुंभारमाठ येथे मालवण पोलिसांनी गस्त सेवे दरम्यान (पेट्रोलींग) आज पहाटे २ युवकांवर गांजा बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. हे दोघेही मुंबई येथून येत होते असे सूत्रांकडून समजते आहे. त्यांच्याकडून १८ ग्रॅम गांजा जप्त झाला असून हे दोन्ही युवक मालवणचेच असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु झाला आहे.
मालवण पोलिसांनी २ युवकांवर गांजा बाळगल्या प्रकरणी केली कारवाई ; दोन्ही युवक मालवणचेच असल्याची माहिती.
316
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -