27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

जिल्हा बॅन्केच्या खारेपाटण शाखेत आज दिवसा ढवळ्या चोरी…!

- Advertisement -
- Advertisement -

चोरट्याचे शिताफीने पलायन..!_

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज भर दुपारी १२.३० ते १२.४५ च्या दरम्यान एका अनोळखी व्यक्ती कडून हातोहात एका ग्राहकाच्या हातातील रोख रुपये १ रक्कम मोजण्याचा बहाण्याने अक्षरशः खेचून घेऊन त्यातील २३५००/- रुपये काढून घेत उर्वरित रक्कम ग्रहकाला परत करत अज्ञात चोरट्याने तेथून लगेच पोबारा केला. या घटनेमुळे बँकेत तसेच खारेपाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खारेपाटण बाजारपेठ येथे असलेल्या वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शिपाई कर्मचारी श्री स्वप्नील सदानंद घाटगे वय २१ वर्षे राहणार ( फोंडाघाट ) हे खारेपाटण एस टी बस स्थानक येथे असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत संस्थेने दिलेले चलन घेऊन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी काऊंटर वरून सुमारे १ लाख रुपये घेतले व समोरील टेबलावर रक्कम मोजत असतानाच त्याच्यावर अगोदरच पाळत ठेवून बसलेला अज्ञात चोरट्याने त्याच्या
हातातील रक्कम हिसकावून घेत यातील या काही ५०० रुपयाच्या नोटा खोट्या असल्याचे त्याला भासवून त्याचेकडील पैसे हात सफाईने व चलाखीने काढून घेत तिथून लगेच पळ काढला. आपली फसवणूक झाली ही बाब या कर्मचान्याच्या लक्षात येताच त्याने संबधित बँक अधिकारी यांना सांगितले. मात्र चौकशी करे पर्यंत सदर चोरटा पळून गेल्याचे लक्षात आले.

घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी श्री उद्धव साबळे तसेच खारेपाटण येथील वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शाखा कर्मचारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानीक बँक अधिकारी यांना सोबत घेऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले. मात्र या चोरी प्रकरणात एकच चोरटा नसुन अजुनही एक दोन व्यक्ती सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून फुटेज मध्ये दिसणारे व्यक्ती अनोळखी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान दुपारी २.०० नंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री अमित यादव व पोलीस उपनिरीक्षक श्री शरद देठे तसेच वैश्यवाणी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीप पारकर यांनी चोरी झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर १ लाख रुपये रकमे पैकी सुमारे २३,५०० /- रुपये एवढी रक्कम अनोळखी अज्ञात चोरट्याने पसार केली असून या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी उद्धव साबळे व त्यांचे सहकारी करीत आहेत. नागरिकांनी अनोळखी माणसांपासून सतर्क राहून, आपले कोणतेही मौल्यवान वस्तू, पैश्याचे व्यवहार कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नये, तसेच अनोळखी व्यक्ती शी बोलणे टाळावे, सध्या गणेशचतुर्थीचा सण तोंडावर आला असून सर्वत्र बँक,बाजरपेठ अश्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चोरी करू शकतात त्यामुळे गर्दीच्या ठिकांणी सुद्धा नागरिकांनी अशा चोरट्यांपासून सतर्क सुरक्षित राहिले पाहिजे असे आवाहन कणकवली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!