खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कनेडी येथे संपन्न झालेल्या कणकवली तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये खारेपाटणच्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील १४ वर्षांखालील मुलांच्या खो-खो संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक करत जिल्हास्तरावर पात्रता मिळवली.
या खोखो संघामध्ये आर्यन जाधव, आर्यन चिके, निनाद तावडे, युवराज खांडेकर, हर्ष गुरव, जय उन्हाळकर, समर्थ लोकरे, मयुरेश दर्पे, सफवान काझी, ताजीम पटेल, मनप्रीत खोसला, समर्थ जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या यशस्वी संघाचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सहसचिव राजेंद्र वरूणकर, खजिनदार संदेश धुमाळे तसेच सर्व संचालक, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, क्रीडाशिक्षक किरसिंग पाडवी व रामदास भिसे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.