खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे गांवातील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांची निवड झाली. मंगळवारी १२ सप्टेंबरला दिवशी शेर्पे गावच्या ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत पांडुरग कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
या वेळी शेर्पे गांव सरपंच स्मिता पांचाळ, उपसरपंच सिराज़ मुजावर, ग्रां. पं सदस्य भूषण शेलार, सायली पांचाळ शुभांगी कापसे , शितल कांबळे, ग्रामसेवक मोहन माने, पोलिस पाटील विनोद शेलार, माजी सरपंच निशा गुरव, धनराज शेलार, संजय कापसे, माजी उपसरपंच अरूण ब्रम्हदंडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास पांचाळ, प्रकाश तेली, परशुराम बेळणेकर, आरोग्यसेवक श्री. जाधव, आणि पशुवैद्यकिय अधिकारी दहीफळे मॅडम तसेच शेर्पे गांवचे ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रकांत कांबळे यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.