चालक बंटी पांचाळ, केदार तारी, प्रसाद केसरकर, मनोज गुरव यांच्या सच्च्या सात्विकतेची होते आहे प्रशंसा.
खारेपाटण | प्रतिनिधी : खाजखी ट्रॅव्हल्सच्या चालक वर्गाच्या प्रामाणीकपणाचा एक अनुभव नुकताच आला व त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आर्या ट्रॅव्हल्स मधून मुंबई ते पाली असा प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे कानातले त्या ट्रॅव्हल्स मध्ये पडले होते. ती महिलाआपल्या मुक्कामी पाली या ठिकाणी उतरली. उतरल्या नंतर काही वेळाने तिला आपल्या एका कानात कानातले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने संपर्क साधत ट्रॅव्हल्स मध्ये कानातले पडले आहे का ते तपासायला सांगितले.
त्यानंतर तत्काळ चालक बंटी पांचाळ, केदार तारी , प्रसाद केसरकर , मनोज गुरव यांनी पूर्ण ट्रॅव्हल्स मध्ये तपासणी केली आणि त्यांना कानातले सापडले. कानातले सापडल्या वर त्यांनी त्या महिलेला संपर्क करून त्यांचे कानातले ट्रॅव्हल्स मध्ये मिळाले असल्याची माहिती देऊन त्या महिलेच्या हाती ऐवज सुपूर्द केला. त्या महिलेने ही चालकांचे आभार मानले व त्यांच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा केली . आर्या ट्रॅव्हल्सचे मालक यांनी देखील त्यांच्या चालक वर्गाचे प्रामाणिकपणाबद्दल विशेष कौतुक केले.