संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या माईण ग्रामपंचायत येथे, १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता महिलांसाठी कौशल्यवृद्धी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामपंचायत माईण व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या कार्यक्रमाला गांवच्या सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गांवातील सर्व महिलांनी ‘केक तयार करणे’ या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण उपक्रमाला प्रशिक्षक श्रीमती स्नेहा कामत,
व्यवस्थापक विवेक मालवणकर, संस्थापक अध्यक्ष श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट श्री नवलराज विजयसिंह काळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.