ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित केलेल्या महाएकादशी सोहळ्यास माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी आणि शिवसैनिकांनी वैभव नाईक यांचे देवालयाची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे, उप विभागप्रमुख मंगेश बांदेकर, मंजू फडके, सुनील करवडकर,सागर पाटकर,गुरु देसाई, पूजा राऊळ, रुपेश खडपकर, अमृता जोशी, विठ्ठल घारे, श्री. मठकर, हेमंत वालावलकर, रवी कांबळे, गोविंद पेडणेकर, आपा वालावलकर आदींसह वालावल ग्रामस्थ उपस्थित होते.