ब्यूरो न्यूज | कट्टा : मालवण तालुक्यातील जान्हवी लाड यांनी एम बी बी एस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. जान्हवी लाड ह्या मालवण तालुक्यातील पराड येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू लाड व बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या कार्यवाह, खरारे पेंडूर गावच्या ग्रा.पं. सदस्या वैष्णवी लाड यांच्या कन्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते दीपक भोगटे तसेच बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, कट्टा संस्था आणि सर्व स्तरातून जान्हवी लाड व त्यांचे पालक यांची प्रशंसा केली जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.