मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथे संग्राम कासले यांच्या ‘चला बोलूया वक्तृत्व स्पर्धा गाजवूया’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक शालेय मुलांच्या वक्तृत्व व वाचन विकासासाठी प्रवृत्त करणारे असल्याचे मंचावर उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

संग्राम कासले ( लेखक : चला बोलूया वक्तृत्व स्पर्धा गाजवूया )

प्रफुल्ल देसाई ( प्रस्तावना लेखन : लेखक : चला बोलूया वक्तृत्व स्पर्धा गाजवूया.)

श्रीराज बादेकर ( मुखपृष्ठ रचनाकार, चला बोलूया वक्तृत्व स्पर्धा गाजवूया.)

बॅरीस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथील या कार्यक्रमात, पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे प्रफुल्ल देसाई व या पुस्तकाचे मुखपृष्ठकार श्रीराज बादेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लेखक संग्राम कासले यांच्या सह उमेश मांजरेकर, प्रफुल्ल देसाई, भाऊ सामंत, ज्योती तोरसकर, सुविधा जाधव, पद्मनाभ शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खंडाळेकर, दीपक भोगटे, सतिश कासले, हेमंत परब, विकी जाधव, हर्षद बेनाडे, सचिन आचरेकर, सुनील खरात, सुप्रिया कासले, मान्यवर व साहित्य प्रेमी उपस्थित होते. सुविधा कासले – जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार ॠतुजा केळकर यांनी मानले.