महिला बचत गटांतील सदस्यांनाही प्राधान्य.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या वतीने धुरीवाडा सागरी महामार्ग येथील हॉटेल आराध्य येथे १२ व १३ सप्टेंबरला दोन दिवसीय आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती यावेळी केली जाणार आहे. तरी आधारकार्ड दुरुस्ती व नोंदणीसाठी ओरिजनल कागदपत्रे यासह नागरिक तसेच महिला बचत गटातील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदार केणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबा ९३७०६३९९६० किंवा ९६३७७७८९९१ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन मंदार केणी यांनी केले आहे.
नवीन आधारकार्ड नोंदणी
० ते १८वयोगटासाठी
१)बर्थ सर्टिफिकेट ( जन्म प्रमाणपत्र ), २) सोबत आई किंवा वडील यांचे आधारकार्ड आवश्यक आहे.
आधार कार्ड फोटो चेंज करणे व मोबाइल नंबर लिंक करणे यासाठी १) आधार कार्ड.
२) मोबाइल नंबर,
३) स्वतः व्यक्ती हजर रहाणे अनिवार्य आहे.
लग्नानंतर चे नांव बदल करणे यासाठी १)मॅरेज सर्टिफिकेट ( विवाह नोंदणी प्रमाणपत्र , २)सरपंच /नगरसेवक फॉर्म दाखला, ३) गॅझेट असेल तर
४)फोटो आवश्यक आहे.
जन्म तारखेत दुरुस्ती तथा बदव करणे यासाठी १) जन्म तारीखचा पुरावा, २)बर्थ सर्टिफिकेट
३) पॅनकार्ड आवश्यक आहे.
(महिलांसाठी)
१)लिव्हिंग सर्टिफकेट. ( शाळा सोडल्याचा दाखला
२)बर्थ सर्टिफिकेट.(या पैकी काहीही एक)
आधारकार्ड वरील पत्ता बदलणे यासाठी १))पत्त्याचा पुरावा
२)सरपंच / नगरसेवक सहीचा दाखला आवश्यक आहे.
वरील आधार कार्ड कॅम्प उपक्रमाचा इच्छुकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.