मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा दशक्रोशी ब्राम्हण मंडळाची मासिक सभा आज रविवारी दुपारी संपन्न झाली. सायंकाळी ४:३० ला ही सभा श्री कौस्तुभ केळकर, आचरा -पारवाडी यांच्या निवासस्थानी आयोजीत झाली होती. या सभेला १५ सभासद उपस्थित होते. सभेचा आरंभ स्वागताने झाला. नंतर अथर्वशीर्ष, दिवंगतांना विनम्र श्रद्धांजली , इतिवृत्त वाचन , वाढदिवस, जमाखर्च वाचन करण्यात आले.
या दरम्यान चतुर्थी बद्दल उलट सुलट मेसेजेस, १९ सप्टेंबर रोजीच चतुर्थी तारीख यांवर सांगोपांग अशी सर्वानुमते चर्चा झाली. नंतर २ ऑक्टोबरला जिल्हा सर्वसाधारण सभेचे आमंत्रण, यंदाचा तालुका मेळाव्याचे यजमानपद,तसेच संवत्सर याग आपल्या विभागाकडे आयोजन आहे याबद्दल चर्चा झाली. विनय वझे यांनी कणकवली येथील गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले गेले. समितींची नावे यादी जाहीर करावी, ऑक्टोबर रविवार रोजी संध्याकाळी ७ :३० वाजता श्री अनिल बापट ( त्रिंबक) यांच्या घरी कोजागिरी पौर्णिमा आणि मासिक सभेचे आयोजन याविषयी चर्चा व प्राथमिक नियोजन करण्यात आले
श्री रामरक्षा श्री भीमरूपी स्तोत्र पठणाने सभेची सांगता झाली व उपस्थित सदस्यांचे आभार मानले गेले. अल्पोपहाराने संपूर्ण सभेची समाप्ती झाली.